फोटो सौजन्य- pinterest
वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण आज रविवार, 7 सप्टेंबर रोजी भारतामध्ये होणार आहे. या ग्रहणाची सुरुवात आज रात्री 9.58 वाजता सुरु होणार आहे आणि 8 सप्टेंबर रोजी पहाटे 1.26 पर्यंत हे ग्रहण चालणार आहे. ग्रहणाचा एकूण कालावधी 3 तास 38 मिनिटे असणार आहे. ग्रहणाच्या वेळी शास्त्रांमध्ये सांगितलेल्या नियमांचे पालन करणे खूप गरजेचे आहे. त्यापैकी एक नियम म्हणजे ग्रहणानंतर आंघोळ करणे. यामागे अनेक धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत. यामागील एक महत्त्वाची कथा म्हणजे महाभारताच्या काळामध्ये ज्यावेळी देवी राधा, यशोदा आणि नंद बाबा ग्रहणानंतर आंघोळ करुन कुरुक्षेत्रात येत असत. ग्रहणानंतर स्नान करणे आवश्यक आहे का? ग्रहणानंतर स्नान करण्याचे काय फायदे आहेत? ग्रहणानंतर जर कोणी स्नान केले नाही तर काय होईल? जाणून घ्या
धार्मिक मान्यतेनुसार, राहू आणि केतू हे दोन्ही अशुभ ग्रहांमुळे चंद्र आणि सूर्यग्रहण होतात. चंद्रग्रहणादरम्यान केतू चंद्रावर परिणाम करतो आणि त्यामुळे नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढतो. त्यानंतर आसुरी शक्ती लवकर संपत नाही. ग्रहणानंतर आंघोळ करणे आवश्यक आहे आणि त्याचे अनेक फायदे आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्याही ग्रहणानंतर प्रत्येकाने आंघोळ केली पाहिजे. पुराणांमध्ये उल्लेख केल्यानुसार, मुलाच्या जन्माच्या वेळी, यज्ञ, सूर्य आणि चंद्र संक्रांती, जरी रात्रीच्या वेळी असली तरी, स्नान करून स्वतःला शुद्ध केले पाहिजे. जर असे केले नाही तर शरीर अशुद्ध राहते.
ग्रहणाच्या वेळी शरीर अशुद्ध होते आणि पूर्वजांच्या कार्यासाठी ते पुन्हा शुद्ध करणे आवश्यक असते. असे म्हटले जाते की, ज्यावेळी ग्रहण असते त्यावेळी अनेक नकारात्मक शक्ती जवळ येतात.
जर आपण व्यवस्थितरित्या पाहिल्यास चंद्रग्रहणाच्या वेळी अनेक प्रकारच्या जंतूंचा प्रभाव वाढतो. ग्रहणाच्या वेळी चंद्रातून निघणाऱ्या प्रकाशाचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहता चंद्रग्रहणाच्या वेळी आंघोळ करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. असे केल्याने अनेक आजारांपासून सुटका होते.
ग्रहणानंतर आंघोळ करण्याचे अनेक फायदे आहेत हे तुम्हाला माहीत असतीलच पण ग्रहणाच्या आधी आंघोळ करण्याचे देखील फायदे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहणाच्या वेळी देवाची पूजा आणि ध्यान करणे पुण्यपूर्ण आहे. त्यामुळे ग्रहण लागण्यापूर्वी, देवाच्या मूर्तींना स्पर्श न करता, संपूर्ण कुटुंबासह स्नान करावे आणि स्तोत्रे म्हणावीत किंवा मंत्र म्हणावेत.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)