फोटो सौजन्य- pinterest
सोमवार, 11 ऑगस्ट रोजी सूर्य आणि शुक्र 36 अंशांमध्ये दशंक योग तयार करतील. या काळामध्ये सूर्य कर्क राशीत असेल तर शुक्र मिथुन राशीमध्ये असेल. हा योग काही राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. सूर्याला आत्मविश्वास आणि आदराचा कारक मानले जाते. तर शुक्र ग्रहाला संपत्ती, प्रेम आणि सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. दशांक योगाचा फायदा कोणत्या राशीच्या लोकांना होणार आहे ते जाणून घेऊया.
मेष राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये दशंक योगाचा प्रभाव पाचव्या घरावर होणार आहे. ज्याचा संबंध शिक्षण, सर्जनशीलता आणि मुलांशी संबंधित आहे. मिथुन राशीत शुक्र आणि कर्क राशीत सूर्याचे संक्रमण तुम्हाला सर्जनशील कार्यात आणि बौद्धिक क्षेत्रात यश मिळून देऊ शकतो. तसेच नोकरी करणाऱ्यांना या काळामध्ये पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. प्रेमसंबंधांमध्ये प्रेम वाढेल आणि अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात.
वृषभ राशीच्या लोकांसाठी दशंक योगाचा प्रभाव चौथ्या घरावर होणार आहे. ज्याचा संबंध आई, आनंद आणि संपत्तीशी संबंधित आहे. मिथुन राशीत शुक्र ग्रहाचे होणारे संक्रमण तुमचे धन घर सक्रिय करेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. यावेळी कर्क राशीत सूर्य असल्याने कौटुंबिक आनंद आणि घरगुती बाबींमध्ये स्थिरता येईल. या काळात तुम्ही नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखू शकता. नोकरीत सहकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल.
मिथुन राशीच्या लोकांसाठी दशंक योगाचा काळ खूप शुभ राहणार आहे. कारण शुक्र ग्रह या राशीत संक्रमण करणार आहे. या योगाचा तुमच्या लग्नावर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे तुमच्यामधील आत्मविश्वास आणि आकर्षण वाढेल. कर्क राशीतील सूर्याचे संक्रमण तुमचे धन आणि वाणीचे घर मजबूत करेल. व्यवसायात नफा, नोकरीत प्रगती आणि प्रेमसंबंधात गोडवा राहील. संवाद आणि माध्यमांशी संबंधित लोकांसाठी हा काळ खूप चांगला राहील.
कन्या राशीच्या लोकांसाठी दशंक योगाचा प्रभाव अकराव्या घरावर होणार आहे. ज्याचा संबंध उत्पन्न आणि नफ्याशी संबंधित आहे. मिथुन राशीत शुक्राचे संक्रमण तुमच्या कर्मभावाला सक्रिय करेल, ज्यामुळे नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. कर्क राशीत सूर्याची उपस्थिती तुमचे नफ्याचे घर मजबूत करेल. या काळामध्ये कन्या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात.
तूळ राशीच्या लोकांसाठी दशंक योगाचा प्रभाव दहाव्या घरावर होणार आहे. ज्याचा संबध करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेशी संबंधित आहे. मिथुन राशीत शुक्र ग्रहाचे तुमचे भाग्य घर सक्रिय करेल, जे भाग्याला अनुकूल असेल. कर्क राशीत सूर्य असताना त्याचा परिणाम तुमच्या कर्मभावावर होईल. ज्यामुळे नोकरीत बढती आणि सन्मान मिळू शकेल. अविवाहितांसाठी लग्नाची शक्यता आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)