फोटो सौजन्य- pinterest
दिवाळी हा प्रकाश आणि आनंदाचा सण आहे, जो अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. या दिवशी दिवे लावणे ही फक्त परंपरा नसून एक अध्यात्मिक परंपरा आहे. ज्यामुळे घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. प्रत्येक पेटलेला दिवा देवी लक्ष्मीचे स्वागत करतो आणि घरात आनंद आणि समृद्धी आणतो. मात्र तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना दिवाळीमध्ये संध्याकाळी नक्की किती दिवे लावावेत ? दिवाळीमध्ये किती दिवे लावणे शुभ मानले जाते जाणून घ्या
हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रानुसार, दिवाळीला किती दिवे लावायचे याचा निश्चित आकडा सांगण्यात आलेला आहे, परंतु काही विशिष्ट संख्या अत्यंत शुभ मानल्या जातात. असे मानले जाते की, या दिवशी 13 दिवे लावणे खूप शुभ मानले जाते. या 13 दिव्यांना लक्ष्मीच्या 13 गुणांचे प्रतीक मानले जाते. ज्याचा संबंध धन, आरोग्य, ज्ञान, कीर्ती, यश, मुलांचे सुख आणि मानसिक शांती यांच्याशी आहे. हे १३ दिवे घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक ऊर्जा आणतात आणि लक्ष्मीची कृपा वर्षभर राहते, असे मानले जाते.
परंपरेनुसार, रात्रभर एक दिवा जळत ठेवावा. याला “अखंड दीपक” असे देखील म्हटले जाते. ज्याला ऊर्जा, शक्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. लक्ष्मीच्या प्रवेशास सुलभ करण्यासाठी हा दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवला जातो. याशिवाय गणपती आणि देवी लक्ष्मीची पूजा करताना आणि अन्नपूर्णा देवीच्या आशीर्वादासाठी स्वयंपाकघरात, पैसे ठेवलेल्या तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या जागी तुळशीच्या रोपाजवळ आणि घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत एक दिवा लावणे शुभ मानले जाते. काही लोक सकारात्मक परिणामांसाठी 51 किंवा 108 दिवे देखील लावतात, कारण ही संख्या देवांना पवित्र आणि प्रसन्न करणारी मानली जाते. दरम्यान, जर घर लहान असेल किंवा वेळ मर्यादित असेल तर कमीत कमी 5 दिवे लावणे अनिवार्य मानले जाते. या पाच दिव्यांचा संबंध आकाश, वायू, पाणी, अग्नी आणि पृथ्वी प्रतीक आहे. दिवाळीच्या रात्री दिवे लावण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे सूर्यास्तानंतर आणि लक्ष्मीपूजनाचा काळ. या दिवशी घरातील सर्व दिवे बंद करून मातीच्या दिव्यांनी वातावरण प्रकाशित करणे खूप शुभ मानले जाते.
असे मानले जाते की, ज्यावेळी भगवान राम वनवास संपवून अयोध्येत परतले तेव्हा अयोध्येच्या लोकांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांच्या परतीचा आनंद साजरा करण्यासाठी दिवे लावून त्यांची घरे आणि संपूर्ण अयोध्या शहर सजवले होते. यामुळे दिवाळीमध्ये तुमचे घर दिव्यांनी सजवणे ही परंपरा आहे. दिवाळी हा पाच दिवसांचा सण आहे, ज्यामध्ये पाचही दिवस दिवे लावले जातात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)