फोटो सौजन्य- pinterest
दसऱ्याचा सण हा प्रामुख्याने भगवान रामाने रावणावर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो, जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. मात्र या सणांबद्दल शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहे.
देशभरामध्ये दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. पंचांगानुसार, दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी हा सण साजरा केला जातो. यंदा गुरुवार, 2 ऑक्टोबर रोजी दसरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला आणि देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला. म्हणून, हा सण सत्याचा असत्यावर विजय म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक आनंद आणि समृद्धी आणण्यासाठी विविध उपाय करतात, परंतु या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. मात्र हे दिवे जर योग्य दिशेने लावले असल्यास त्याचे चांगले फायदे होतात. दसऱ्याला नेमके किती दिवे लावणे शुभ आहे? दसऱ्याला दिवे लावण्यासाठी कोणती दिशा सर्वोत्तम आहे? दिवे लावण्यासाठी वेळ शुभ कोणती आहे? जाणून घ्या
धार्मिक मान्यतेनुसार, दसऱ्याला दहाही दिशांना 10 दिवे लावण्याची प्रथा आहे. म्हणून, दसऱ्याला प्रत्येकाने दहा दिवे लावावेत. या सर्व दिव्यांमध्ये मोहरीचे तेल वापरावे. याशिवाय, तुळशी, पिंपळ, शमी, वड आणि केळी इत्यादी पूजनीय वनस्पतजवळ 5 दिवे ठेवावेत. त्यामध्ये तिळाच्या तेलाचा वापर करावा.
दसऱ्याला दिवे लावण्याची परंपरा प्राचीन आहे. म्हणून लोक या दिवशी दिवे लावतात. रामासमोर तुपाचा दिवा लावावा. याशिवाय घरातील तिजोरीजवळ दिवा लावावा. यादरम्यान तुम्ही दिव्यामध्ये जवसाचे तेल वापरू शकता.
धार्मिक मान्यतेनुसार, या शुभ दिवशी दहाही दिशांना दिवे लावावेत. यामध्ये पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, पूर्व-उत्तर, आग्नेय, पश्चिम-उत्तर, नैऋत्य, उर्ध्व या दिशांचा देखील समावेश आहे.
दसऱ्याला दिवे लावण्याची वेळ खूप महत्त्वाची आहे. दसऱ्याच्या दिवशी दिवे लावण्याची परंपरा आहे. यावेळी दिवे लावताना वेळेचा देखील विचार केला पाहिजे. दरम्यान दिवा लावताना सकाळ आणि संध्याकाळी रामाच्या जवळ दिवा लावावा. त्यानंतर संध्याकाळी इतर दिवे लावणे खूप शुभ मानले जाते. संध्याकाळची वेळ अनुकूल मानली जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)