साक्षात नारदमुनींनी दृष्टांत दिला हे पाहून सत्यश्रवा भारवला. नारदमुनींनी सत्यश्रवाला सगळी हरिकत सांगितली. मुनिवर म्हणाले की, हा बालक कोणी साध सुदं नव्हे. साक्षात पिप्पलनारायणांनी जन्म घेतला आहे. या बाळाला तुला 12 वर्ष सांभाळायचं आहे. 12 व्या वर्षानंतर या बाळाला सिद्धी प्राप्ती होईल. आणि नाथसंप्रदायात याचा समावेश होईल. या बाळाचं नाव चरपती ठेव, असं नारदमुनींनी सत्यश्रवाला सांगितलं. नारदमुनींच्या सांगण्यानुसार सत्यश्रवाने बाळाचं संगोपन केलं. वयाच्या 12 व्या वर्षानंतर दत्तगुरुंच्या योजनेप्रमाणे चरपतीनाथसंप्रदायाचा भाग झाला आणि चरपतीला सिद्धी प्राप्त झाल्यानंतर चरपतीनाथ म्हणून य़ांना ओळख मिळाली. चरपतीनाथ हे नाथसंप्रदायातील शेवटचे नाथ होते. या चरपतीनाथांचं मुख्य समाधीस्थळ हे हिमाचल प्रदेशमध्ये असल्याचं म्हटलं जातं.
Vitthal-Rukmini: पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणीला चंदन उटी लावण्याची काय आहे परंपरा जाणून घ्या
दत्तगुरुंचे तीन अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंहसरस्वती आणि श्री स्वामी समर्थ. दत्तगुरुंना मानणारा त्यांना पुजणारा अनुयायी वर्ग खूप मोठा आहे. याच दत्तसंप्रदायाचा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे नवनाथ. दत्तसंप्रदायात नवनाथ म्हणजे अध्यात्म, योग, आणि दत्ततत्त्व यांचं मूर्त स्वरूप मानलं जातं. “नवनाथ” म्हणजे भगवान दत्तात्रेयांच्या नऊ प्रमुख अवतार स्वरूपात अवतरलेले महान योगी. हे नवनाथ दत्तसंप्रदायाचे आधारस्तंभ मानले जातात. त्यांनी जगभर दैवी ज्ञान, भक्ति, आणि योगमार्गाचा प्रसार केला.
दत्तसंप्रदायाचा खरा पाया रचला, तो या नवनाथांनी असं म्हटलं जातं. जो नंतर महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि नेपाळपर्यंत पसरला. नवनाथ परंपरेतूनच नंतर नाथसंप्रदाय आणि अवधूत परंपरा विकसित झाली असं देखील सांगितलं जातं. नवनाथांनीसमाजातील सर्व घटकांना स्त्री, शूद्र, गरीब असा कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला भक्तीमार्ग स्विकारण्याता अधिकार आहे, परमार्थ हा ईश्वर आणि ईश्वारापुढे उच्च निच्च असं काही राहत नाही ही शिकवण नवनाथांनी दिली. परमार्थातून भक्तीमार्ग मिळतो त्यामुळे आपले कर्म चांगले ठेवा हे त्यांनी सांगितलं. नवनाथ म्हणजे केवळ संत नाहीत, ते दत्ततत्त्वाचे विस्तार आहेत. त्यांनी अध्यात्माला लोकजीवनाशी जोडून प्रत्येकाला परमेश्वराशी एकरूप होण्याचा मार्ग दाखवला. म्हणूनच दत्तसंप्रदायात नवनाथांचं स्थान गुरुतुल्य आणि पूजनीय मानलं जातं.






