फोटो सौजन्य: Pinterest
आष्टांगिक मार्ग हा गौतम बुद्ध यांनी सांगितलेला बौद्ध धर्मातील अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. हा मार्ग दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी उपयोगी ठरतो. याला “मध्यम मार्ग” असेही म्हणतात, कारण तो अति सुख आणि अति दु:ख या दोन्ही टोकांपासून दूर राहण्याची शिकवण देतो. कोणत्याही परिस्थितीत भावनांचा कडेलोट झाला तर वाट्याला त्रास येणं हे स्वाभाविक असतं. त्यामुळे परिस्थिती कशीही असो आतून शांत राहणं महत्वाचं आहे. हेच बुद्ध त्यांच्या अष्टांग मार्गातून सांगतात.






