फोटो सौजन्य- istock
शुक्र ग्रहांशी संबंधित असलेले ओपल रत्न. ओपल रत्न हे दिसायला दुधाळ किंवा पांढऱ्या रंगांचे असतात. या रत्नाला योग्य पद्धत आणि नियमाने परिधान केल्यास ग्रह मजबूत होण्यास मदत होते. प्रत्येक रत्न परिधान करण्यासाठी त्याला वेगवेगळे नियम असतात ज्यांचे पालन करणे गरजेचे असते. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रहांचा संबंध संपत्ती ही वैभव, प्रेम आणि सौंदर्याशी संबंधित आहे. ओपल रत्न परिधान केल्याने जीवनात प्रेमसंबंध, लोकप्रियता आणि आर्थिक स्थिती सुधारते. रत्नशास्त्रानुसार, कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार आणि राशीनुसार रत्ने धारण करावीत. जाणून घ्या ओपल रत्न कधी, कसे आणि कोणी धारण करावे.
ओपल शुक्राशी संबंधित असल्याने शुक्रवारी ते घालणे शुभ मानले जाते. हे रत्न परिधान करण्यापूर्वी शुद्ध करणे गरजेचे आहे. हे रत्न धारण केल्याने व्यक्तीला अनेक फायदे होतात.
शुक्राचे ओपल रत्न चांदीच्या अंगठीत घालून परिधान करावे. शुक्रवारी पाणी आणि दूध टाकून ओपल रत्न शुद्ध करुन घ्यावे. ‘ॐ द्रम द्रम द्रम सह शुक्राय नम:’ या शुक्र मंत्राचा जप करा आणि नंतर ते उजव्या हाताच्या अनामिका बोटावर धारण करा. हे रत्न अनामिका बोटात धारण करावे.
ज्योतिषशास्त्रानुसार, ओपल रत्न हे शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. शुक्राचे हे रत्न वृषभ आणि तूळ राशीच्या राशीत जन्मलेले लोक हे रत्न परिधान करु शकतात. त्यासोबतच मिथुन, कन्या, कुंभ व मकर राशीचे लोकदेखील हे रत्न परिधान करु शकतात.
रत्नशास्त्रानुसार, ओपल रत्नांसोबत मूंगा, मोती आणि माणिक्य रत्न परिधान करु नये. ओपल रत्न परिधान करण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या ग्रहांची स्थिती तपासली पाहिजे. ज्योतिषाचा सल्ला घेणे चांगले राहील.
ज्योतिषशास्त्रानुसार, ओपल रत्न धारण केल्याने व्यक्तीला नशीबाची साथ लाभते, असे मानले जाते. ओपल रत्न धारण केल्याने वैवाहिक जीवन आनंदी होते. जर पती-पत्नीमध्ये नेहमीच मतभेद असतील तर हे रत्न धारण केल्याने समस्या सुटते. हे रत्न धारण केल्याने मानसिक शांती मिळते. हे रत्न विशेषतः टीव्ही, सिनेमा, नाट्य आणि आयटी क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी फायदेशीर आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)