फोटो सौजन्य- pinterest
नोव्हेंबर महिना हा ग्रहांच्या दृष्टिकोनातून खूप खास मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, या महिन्यात होणाऱ्या संक्रमणाचा सर्व राशीच्या लोकांवर विविध प्रकारे परिणाम होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या ग्रहांच्या संक्रमणामुळे व्यक्तीच्या करिअर, पैशाच्या व्यवस्थापनात आणि नातेसंबंधांमध्ये काही बदल घडून येऊ शकतात. ग्रहांच्या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांवर कसा परिणाम होणार आहे ते जाणून घ्या
रविवार, 16 नोव्हेंबर रोजी सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल. या राशी बदलामुळे काही व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल आणि सरकारी कामातही फायदा होऊ शकतो.
मंगळवार, 18 नोव्हेंबर या दिवशी शुक्र अनुराधा नक्षत्रात प्रवेश करेल. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी शुक्र तूळ राशीत प्रवेश करेल आणि नंतर वृश्चिक राशीत प्रवेश करेल. या काळामध्ये काही राशीच्या लोकांची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरीमध्ये अपेक्षित यश मिळू शकते. तसेच 27 नोव्हेंबरपासून बुध वक्री होईल त्यामुळे तुम्हाला व्यवसायामध्ये देखील त्याचा फायदा होईल.
सोमवार, 24 नोव्हेंबर या दिवसापासून गुरु ग्रह वक्री होईल. याचा काही राशींच्या निर्णय क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. तर काहींना गुंतवणूक, शिक्षण आणि आर्थिक बाबींमध्ये अडथळे येऊ शकतात.
गुरुवार, 27 नोव्हेंबर रोजी शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल. यामुळे काही राशींमध्ये आर्थिक बदल होऊ शकतात.
या काळामध्ये मेष राशीच्या लोकांना नोकरी आणि करिअरमध्ये मोठा बदल होताना दिसून येईल.
या काळामध्ये मेष राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्येही तुम्हाला दिलासा मिळू शकेल.
या राशीच्या लोकांच्या कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. तुमच्या जोडीदाराकडून आणि कुटुंबाकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल.
प्रेमसंबंध दृढ होतील. महत्त्वाची कामे यशस्वी होऊ शकतात.
सिंह राशीच्या लोकांना या संक्रमणाचा मालमत्तेचा फायदा होऊ शकतो आणि मानसिक शांती अनुभवता येईल.
कन्या राशीच्या लोकांना या संक्रमणादरम्यान पदोन्नती मिळू शकते आणि प्रवासाची शक्यता देखील आहे.
तूळ राशीच्या लोकांना नोव्हेंबर महिन्यात आर्थिक समस्या येऊ शकतात, परंतु त्यांचे आरोग्य सुधारेल.
वृश्चिक राशीच्या लोकांना नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या करिअरमध्ये यश मिळू शकते.
धनु राशीच्या लोकांचे या महिन्यात तुमचे खर्च वाढतील, परंतु जुनी कामेही पूर्ण होऊ शकतात.
मकर राशीच्या लोकांसाठी ग्रहांचे हे संक्रमण बदलामुळे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता निर्माण होत आहे.
कुंभ राशीच्या लोकांना या महिन्यात त्यांच्या नोकरीत आदर मिळू शकेल.
नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ग्रहांच्या संक्रमणाचा मीन राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होणार आहे. या काळामध्ये आर्थिक वाढ होऊ शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: नोव्हेंबरमध्ये 5 ग्रह संक्रमण करणार आहे
Ans: नोव्हेंबरमध्ये गुरु, शनि, शुक्र, सूर्य आणि बुध हे ग्रह संक्रमण करणार आहे
Ans: ग्रहांच्या संक्रमणाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होणार आहे






