फोटो सौजन्य- pinterest
बुधवार, 13 ऑगस्ट रोजी सकाळी 5.44 वाजता गुरु मिथुन राशीत राहून पुनर्वसु नक्षत्रात संक्रमण करणार आहे. हे संक्रमण 18 जून 2026 पर्यंत राहणार आहे. ज्याचा कालावधी सुमारे 10 महिन्यांचा दीर्घ कालावधी राहील. ज्योतिषशस्त्रानुसार, गुरु ग्रह हा एक शुभ ग्रह मानला जातो. ज्याला ज्ञान, समृद्धी आणि अध्यात्म दर्शवितो. पुनर्वसु नक्षत्राचा स्वामीदेखील गुरु मानला जातो.
या नक्षत्राला सकारात्मकता, पुनर्जन्म आणि बौद्धिक विकासाचे कारक मानले जाते. या संक्रमणाचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होऊ शकतो. परंतु काही राशींच्या लोकांना याचा विशेष फायदा होऊ शकतो. गुरुच्या नक्षत्र परिवर्तनाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
मेष राशीच्या कुंडलीमध्ये गुरु ग्रहाचे संक्रमण तिसऱ्या घरात होणार आहे. तिसरे घर हे धैर्य, संवाद आणि लहान प्रवासाचे आहे. पुनर्वसु नक्षत्राची ऊर्जा तुमची बौद्धिक क्षमता आणि सर्जनशीलता वाढवण्यास मदत करते. या काळामध्ये तुम्ही लेखन, मार्केटिंग किंवा डिजिटल क्षेत्रात यश मिळू शकते. यावेळी तुमचे भावंडांसोबतचे नाते दृढ होईल. या काळामध्ये वैवाहिक जीवन, नशीब आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढतील. या काळात तुमचे संवाद कौशल्य सुधारेल. आर्थिक लाभ होऊ शकतात.
मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहांचे नक्षत्र संक्रमण पहिल्या घरात होईल. पुनर्वसु नक्षत्रात गुरुचा प्रभाव तुमच्या वैयक्तिक विकास आणि आत्मविश्वासात वाढ करेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा करण्याची आणि नवीन संधी स्वीकारण्याची ही वेळ आहे. यावेळी तुम्हाला शिक्षण, प्रेम आणि नशिबाच्या क्षेत्रात सकारात्मक बदल होतील. तसेच भागीदारीमध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळू शकते. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील.
तूळ राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहांचे नक्षत्र संक्रमण नवव्या घरात होईल. या संक्रमणामुळे भाग्य, उच्च शिक्षण आणि अध्यात्माचे आहे. पुनर्वसु नक्षत्राची सकारात्मक ऊर्जा तुम्हाला धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांकडे घेऊन जाईल. या काळात तुम्ही धार्मिक यात्रेला जाऊ शकता. ज्यामुळे व्यक्तिमत्व, धैर्य आणि सर्जनशीलता वाढेल. हा काळ उच्च शिक्षणासाठी देखील अनुकूल राहील. यावेळी तुम्हाला नशिबाची साथ लाभेल. समाजातही तुमचा आदर वाढेल.
गुरूची स्वतःची मीन रास आहे आणि हे संक्रमण चौथ्या घरात होत आहे. याचा संबंध घर, आई आणि सुखाचे प्रतिनिधित्व करते. पुनर्वसु नक्षत्राची शक्ती तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील. या काळात मालमत्ता खरेदी करण्यासाठी हा काळ खूप चांगला मानला जातो. या काळामध्ये करिअरमध्ये स्थिरता आणि आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. तसेच कौटुंबिक आनंद देखील मिळू शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)