फोटो सौजन्य- istock
अनेकांना त्यांच्या आयुष्यात कोणतेही तीर्थयात्रा करता येत नाही. अशा लोकांच्या मृत्यूनंतर भरणी श्राद्ध केले जाते जेणेकरून त्यांना मातृगया, पितृगया, पुष्कर तीर्थ आणि बद्रिकेदार इत्यादी तीर्थस्थानांवर केलेल्या श्राद्धाचे फळ मिळावे.
पितृ पक्षातील भरणी नक्षत्राच्या दिवशी भरणी श्राद्ध केले जाते यालाच महाभरणी असे नाव आहे. हे एकाच उद्देशाने केले जाते. व्यक्तीच्या मृत्यूनंतर पहिल्या वर्षी भरणी श्राद्ध केले जात नाही. यंदा आज शनिवार, 21 सप्टेंबर रोजी भरणी श्राद्ध करायचे आहे. हे श्राद्ध सर्वांनी करुन चालत नाही मग नेमकं हे श्राद्ध कोणी करावे ते जाणून घेऊया.
हेदेखील वाचा- पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या
भरणी श्राद्ध पहिल्या वर्षानंतर करावे. खरे तर, शास्त्रात दरवर्षी भरणी श्राद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु जे लोक ते एकदाच करतात त्यांनी भरणी श्राद्ध किमान पहिल्या वर्षभर करू नये. भरणी श्राद्ध केल्याने महापुण्य लाभते असे म्हटले जाते. कारण हे श्राद्ध केल्यावर मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभते आणि तो आत्मा भवसागरातून मुक्त होतो. त्यामुळे श्राद्धविधी केल्याचे पुण्य पदरात पडते असे म्हटले जाते. परंतु ते वर्षानंतरच का करावे? तर वर्षश्राद्ध झाल्यानंतरच मृत व्यक्तीचे प्रेतत्व नष्ट होते. त्या आत्म्याला पितरांमध्ये स्थान मिळते आणि त्या पितरांची पूजा पितृपक्षात करता येते.
हेदेखील वाचा- पितृपक्षात तर्पण न केल्यास पूर्वज मुलांना शाप देतात का? काय सांगते गरुड पुराण
संकष्टीचा उपवास आणि पितरांचा नैवेद्य
आज शनिवार, 21 सप्टेंबर रोजी संकष्टी चतुर्थी आहे आणि भरणी नक्षत्रसुद्धा आहे. पितृपक्षात ज्या दिवशी हे नक्षत्र येते त्या दिवशी हे श्राद्ध करायचे असते. संकष्टीला अनेकांचा उपवास असतो त्याच दिवशी भरणी श्राद्ध आल्यास पितरांना नैवेद्य कसा दाखवायचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जरा थांबा! उपवास गणपतीचा आणि श्राद्ध विधी पित्तरांसाठी या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असल्याने श्राद्धाचे स्वयंपाक करुन पित्तरांना नैवेद्य दाखवायचा आणि तो नैवेद्या आपण खाऊ शकलो नाहीतर एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा वाया घालवु नका. नैवेद्याचा प्रसाद संध्याकाळी उपवास सोडताना खावू शकता. 21 सप्टेंबर रोजी चंद्रोद्य रात्री 9. 4 मिनिटांनी आहे आणि भरणी श्राद्ध सकाळी करुन घ्यावे.