फोटो सौजन्य- pinterest
२५ जूनला निर्जला एकादशी आहे. या दिवशी आणखी एक दुर्मिळ संयोग तयार होत आहे ज्यानुसार, निर्जला एकदशीला लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण आहे. निर्जला एकादशी दिवशी शुक्र आणि बुध ग्रह कर्क राशीत एकत्र येत आहे. लक्ष्मी नारायण योगाचा फायदा तीन राशींच्या लोकांना होणार आहे. या दुर्मिळ संयोग कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरेल, ते जाणून घेऊया.
ज्योतिषशास्त्रानुसार, बुध आणि शुक्र या दोन प्रमुख ग्रहांच्या युतीने हा योग तयार होतो. बुध ग्रहांचा संबंध बुद्धिमत्ता, तर्क, वाणी आणि व्यवसाय यांच्याशी संबंधित आहे. तर शुक्र ग्रहाचा संबंध संपत्ती, समृद्धी, ऐश्वर्य, सौंदर्य आणि सुखसोयी यांच्याशी संबंधित आहे. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील एकाच घरात बुध आणि शुक्र एकत्र येतात, तेव्हा ‘लक्ष्मी नारायण योग’ तयार होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, बुधाला ‘नारायणाचे’ आणि शुक्राला ‘लक्ष्मीचे’ प्रतीक मानले जाते, त्यामुळे त्यांची युती अत्यंत शुभ मानली जाते.
करिअरच्या दृष्टीने तुमचे प्रयत्नांना चांगले यश मिळेल. दिर्घकाळापासून प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसायासंबधी नव्या योजनामधून फायदा होईल. जे लोत नवीन दुकान किंवा स्टार्ट अप सुरु करू इच्छित आहे त्यांच्यासाठी चांगला काळ आहे. नोकरदार लोकांची पदोन्नती होईल. नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारल्याने वैवाहिक जीवनामध्ये चागले परिणाम मिळतील.
निर्जला एकादशीला लक्ष्मी नारायण राजयोग तुमच्या राशीत निर्माण होत आहे. हा योग तुमची प्रगती आणि आर्थिक स्थिती सुधारेल याचा संकेत आहे. करिअरमध्ये करण्यात आलेली मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील ज्यामुळे तुमचे उत्पन्नात वाढ होऊ शकते. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. समाजात प्रतिष्ठा आणि सन्मान वाढण्याचे संकेत दिसत आहे.
लक्ष्मी नारायण राजयोगामुळे तुमच्यासाठी प्रगतीचे दार उघडेल. दिर्घकाळापासून सुरु असलेल्या समस्या समाप्त होतील. नोकरी आणि व्यापारामध्ये केलेल्या प्रयत्नांचे चांगले परिणाम मिळतील. आत्मविश्वास वाढेल, आर्थिक स्थिति सुधारल्याने कौंटुबिक नातेसंबंधामध्ये सकारात्मक बदल होईल. मानसिक दबाव कमी होण्यामुळे मन संतुलित आणि शांत राहील. समाजामध्ये तुमचे मान-सन्मान वाढेल.
ज्योतिष शास्त्रानुसार बुध शुक्राच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण योगामुळे सुख-समृद्धि आणि यशाचे प्रतिक मानले जाते. हा योग व्यक्तीला धन लाभ, भौतिक सुख आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. निर्जला एकादशीला शुभ तिथि निर्माण होणे अत्यंत एक शभ आणि दर्मिळ संयोग आहे
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: ज्योतिषशास्त्रानुसार गुरु (बृहस्पति) आणि शुक्र ग्रहांच्या विशिष्ट शुभ स्थिती किंवा संयोगामुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होतो. हा योग धन, समृद्धी, यश आणि सुख-समाधान देणारा शुभ योग मानला जातो
Ans: निर्जला एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित अत्यंत पवित्र तिथी मानली जाते. या दिवशी शुभ ग्रहयोग निर्माण झाल्यास त्याचे धार्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व अधिक असल्याचे मानले जाते.
Ans: लक्ष्मी नारायण राजयोगाचा वृषभ, कर्क आणि तूळ राशींच्या लोकांना फायदा होणार






