फोटो सौजन्य- सोशल मीडिया
हिंदू धर्मात वर्षातील सर्व १२ महिने विशेष आहेत. मार्गशीर्ष हा मराठी दिनदर्शिकेतील नववा महिना. हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे. मराठी महिन्याला आपलं असं पावित्र्य आणि महत्त्व असतं. महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी वैभव लक्ष्मी व्रत करण्याची परंपरा आहे.
चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण 27 नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सान्निध्यात येते तेव्हां जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात. या महिन्यात केले जाणारे शुभ कार्य अत्यंत फलदायी असते. या काळात मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवाराला विशेष महत्त्व आहे तर वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करुन कुटुंबात समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे यासाठी प्रार्थना केली जाते. यंदा मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरु होतोय आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊया
मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरु होते. यंदा मार्गशीर्ष महिना हा आज 2 डिसेंबरपासून सुरु होत आहे. तसेच या दिवशी देव दिवाळी देखील साजरी होणार आहे. मार्तंडभैरवषड् रात्रोत्सवारंभ देखील सुरु होईल. यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला आणि शेवटचा गुरुवार अतिशय खास असणार आहे.
वास्तू शास्त्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
धार्मिक मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णामुळे मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या काळात उपवास आणि नामस्मरण केल्याने अधिक चांगले फल मिळते. तसेच भगवद्गीतेचे पठण करायला हवे.
यंदा 2024 मध्ये मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे चार असणार आहेत. पहिला महालक्ष्मी गुरुवारचं व्रत हे 5 डिसेंबर 2024 ला असणार आहे. या दिवशी विनायक चतुर्थीचं व्रतदेखील असणार आहे. त्यानंतर 12 डिसेंबरला दुसरं मार्गशीर्ष गुरुवार, 19 डिसेंबरला तिसरं मार्गशीर्ष गुरुवार आणि 26 डिसेंबरला चौथ आणि शेवटचा गुरुवार व्रत असणार आहे. 26 डिसेंबर 2024 ला सफला एकादशीचं व्रत असणार आहे.
राशिभविष्य संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
घरातील ज्या ठिकाणी घट बसवायचे आहे तिथे गोमुत्र शिंपडल्यानंतर स्वच्छ पाण्याने जागा पवित्र करा. त्यानंतर रांगोळी काढा. त्यावर चौरंग किंवा पाट ठेवा. चौरंग किंवा पाटावर लाल कपडा परिधान करा. आता मध्यभागी तांदूळ ठेवून कळश स्थापन करा. कळशात दुर्वा, पैसे आणि सुपारी घाला. आंब्याची पाच पान ठेवून त्यावर नारळ ठेवावा. या नारळाला तुम्ही माता लक्ष्मीचा मुखवटा लावू शकता. अगदी कळशाला ब्लाऊज पीसने सजवा. आता लक्ष्मीला दागिन्यांनी शृंगार करा. कळशाला चारही बाजून हळद-कुंकू लावा. चौरंगावर देवी लक्ष्मीचा फोटो आणि श्रीयंत्र ठेवा. देवीपुढे पाच फळं, लक्ष्मी कवडी यांची मांडणी करावी. तसंच देवीपुढे पाच पानांचा विडा ठेवावा. नैवेद्य म्हणून लाह्या, गुळ, बाताशे नक्की ठेवा.
मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरुपात घट बसवण्याची परंपरा आहे. यासाठी बाजारात खास महालक्ष्मी देवीचे मुखवटा आणि पोशाख उपलब्ध आहेत. दर गुरुवारी घट बसून महालक्ष्मीची पूजा करुन हार वेणी किंवा गजरा अर्पण केला जातो.
गुरुवारी सकाळी घट बसल्यानंतर सकाळी संध्याकाळी घटाची पूजा केली जाते. महिला दिवसभर उपवास करु संध्याकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो. तर मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन करण्यात येतं. यादिवशी एखाद्या विवाहित महिलेची खण साडीने ओटी भरावी. त्याशिवाय महिलांना हळदी कुंक, फुल आणि वाणाच्या स्वरूपात भेटवस्तू देऊन गुरुवारचं उद्यापन करतात.