फोटो सौजन्य- pinterest
दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला मासिक दुर्गाष्टमीचे व्रत पाळले जाते. हे व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी येते आणि देवीचा कायम तुमच्यावर आशीर्वाद राहतो, अशी मान्यता आहे. यावेळी श्रावण महिन्यातील मासिक दुर्गाष्टमीचे व्रत आज शुक्रवार, 1 ऑगस्ट रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी भाविक देवी दुर्गेची पूजा करतात.
या दिवशी देवीला काही वस्तू अर्पण केल्याने देवीचा भक्तांवर आशीर्वाद राहतात, अशी मान्यता आहे. मासिक दुर्गाष्टमीला कोणते उपाय करावे, जाणून घ्या
श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी 1 ऑगस्ट रोजी सकाळी 4 वाजून 58 मिनिटांनी सुरु झाली आहे आणि या तिथीची समाप्ती 2 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजून 23 मिनिटांनी होणार आहे. यावेळी देवीची पूजा निशाकाळामध्ये केली जाणार आहे. उद्यतिथीनुसार मासिक दुर्गाष्टमीचे व्रत आज 1 ऑगस्ट रोजी पाळले जाणार आहे.
श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला शुभ योग तयार होत आहे. यावेळी विजय आणि सिद्धी योग तयार होत आहे. हा योग पूर्ण दिवसभर राहणार आहे. या दिवशी रवी योग देखील तयार होणार आहे. या काळामध्ये पूजा करणे शुभ मानले जाते.
या दिवशी देवी दुर्गाला लाल फुले, सिंदूर आणि श्रृगांराच्या वस्तू अर्पण कराव्यात.
तसेच देवीच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा.
त्यानंतर देवीची आरती करावी.
या दिवशी मंत्रांचा जप करणे आणि दान करणे देखील खूप फायदेशीर असल्याचे मानले जाते.
मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी करा हे उपाय
मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी मंत्रांचा जप करण्याला विशेष महत्त्व आहे. तसेच “या देवी सर्वभूतेषु” या मंत्राचा 11 वेळा जप करणे खूप शुभ मानले जाते. तसेच या दिवशी “ओम जयंती मंगला काली” या मंत्राचा जप करावा.
मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी दानधर्म करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. या दिवशी गरजू लोकांना अन्न, कपडे आणि इतर आवश्यक वस्तूंचे दान करावे.
मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी कन्यापूजन करावे. दुर्गाष्टमीच्या दिवशी 9 मुलींना जेवण घालणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे देखील शुभ मानले जाते.
मासिक दुर्गाष्टमीच्या घरामध्ये हवन करणे करणे देखील शुभ मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)