फोटो सौजन्य- pinterest
श्रावण महिन्यामध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात. या सणांना हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. श्रावण महिन्याची सुरुवात होताच नागपंचमी, रक्षाबंधन त्यानंतर कृष्ण जन्माष्टमीचा सण येतो. हिंदू धर्मामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरा करण्यात येतो.
यावेळी श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये देखील मोठा उत्साह दिसून येतो. श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री रोहिणी नक्षत्रात झाला होता. त्यावेळी त्यांनी आठवा अवतार घेतला होता. यंदा कृष्ण जन्माष्टमीचा सण काही दिवसांवर आलेला आहे. काही जण जन्माष्टमीचा उपवास देखील करतात. कृष्ण जन्माष्टमी नेमकी कधी आहे आणि त्या दिवशी मुहूर्त कोणता आहे जाणून घेऊया
श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीची सुरुवात शुक्रवार, 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 8.19 वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती शनिवार, 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी होईल. त्यामुळे यावर्षी कृष्ण जन्माष्टमीचा सण शनिवार, 16 ऑगस्ट रोजी सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येईल.
श्रीकृष्णाची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त शनिवार, 16 ऑगस्टच्या रात्री 12.4 ते 12.47 पर्यंत असेल. या काळात पूजा करणे शुभ मानले जाते.
ब्रम्ह मुहूर्त पहाटे 4.24 ते 5.7 पर्यंत असेल
विजय मुहूर्त – दुपारी 2.37 ते 3.30 पर्यंत राहील
गोधूलि मुहूर्त – संध्याकाळी 7 ते 7.22 पर्यंत
निशिता वेळ – पहाटे 12.4 ते 12.47 पर्यंत
रोहिणी नक्षत्राची सुरुवात 17 ऑगस्ट रोजी पहाटे 4.38 वाजता होईल आणि याची समाप्ती 18 ऑगस्ट रोजी पहाटे 3.17 वाजता होईल.
पिवळे वस्त्र, दिवा, तूप, मध, दूध, वात, गंगाजल, दिवा, दही, अगरबत्ती, तांदूळ, तुळशीची पाने, फळे, मिठाई, साखर, मिठाई आणि इत्यादी साहित्य जन्माष्टमीच्या पूजेमध्ये वापरावे.
श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी सकाळी लवकर उठून आवरुन झाल्यावर श्रीकृष्णाची पूजा करावी. त्यानंतर त्यांना मोरपंख अर्पण करावे. मान्यतेनुसार हे उपाय केल्याने घरामधील सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते.
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः
ॐ कृं कृष्णायं नमः
ॐ नमः भगवते श्री गोविन्दाय
कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पूजा करताना गोपाल स्तोत्राचे पठण करा. असे केल्याने अपत्यप्राप्ती होते आणि नकारात्मक ऊर्जेपासून सुटका देखील होते. कुटुंबामध्ये आऩंदाचे वातावरण राहते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)