फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र ग्रह प्रेम, सौंदर्य, कला, भौतिक सुख आणि सर्जनशीलतेचे प्रतीक मानला जातो. शनिवार, 23 ऑगस्ट रोजी रात्री 8.42 वाजता शुक्र कर्क राशीत राहून पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे. हे नक्षत्र सर्व नक्षत्रांपैकी एक शुभ नक्षत्र मानले जाते. गुरु ग्रहाची कृपा आणि शनीची स्थिरता दोन्ही एकत्र करते. अशा वेळी शुक्र ग्रहाचे संक्रमण हे काही राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल घडवून आणतात.
या काळात लोकांचे प्रेम आणि वैवाहिक जीवन गोड राहील तर आर्थिक स्थिती देखील चांगली राहील. सर्जनशीलता आणि कलेशी
संबंधित असणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळू शकतात. चंद्राच्या प्रभुत्वामुळे या संक्रमणाचा परिणाम खोलवर आणि नातेसंबंधावर होताना दिसून येईल. शुक्र ग्रहाच्या संक्रमणाचा परिणाम कोणत्या राशीच्या लोकांवर होणार आहे, जाणून घ्या
वृषभ राशीचा स्वामी स्वतः शुक्र असल्याने या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण खूप महत्त्वाचे मानले जाते. तिसऱ्या भावावर त्याचा प्रभाव धैर्य, संवाद आणि भावंडांशी संबंधित असल्याने याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. या काळात तुमची सर्जनशीलता आणि बोलण्याची क्षमता आणखी बदलू शकते. लेखन, कला किंवा माध्यमांशी संबंधित असलेल्या लोकांना अपेक्षित यश मिळू शकते. तुम्हाला तुमच्या भावंडांकडून किंवा मित्रांकडून पाठिंबा मिळेल. व्यवसायात भागीदारीमध्ये काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
Vastu Tips: स्वयंपाकघरात टाइल्स निवडताना चुका झाल्यास होऊ शकतो वास्तूदोष, या गोष्टी ठेवा लक्षात
मिथुन राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण चांगले राहील. ज्याचा संबंध धन, वाणी आणि कुटुंबाशी आहे. शुक्राच्या प्रभावामुळे तुमचे बोलणे आणखी गोड होईल. व्यवसाय आणि कला क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांना अधिक फायदे होऊ शकता. आर्थिक स्थिती चांगली राहील. या काळात नवीन कपडे, दागिने किंवा सौंदर्याशी संबंधित वस्तू खरेदी करु शकतात. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तसेच काही शुभ कार्यक्रमाचे आयोजन करु शकते.
कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचे संक्रमण चांगले राहील. शुक्र ग्रहाचा संबंध नफा, मित्र आणि इच्छांशी संबंधित आहे. तुम्हाला आर्थिक लाभ आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या सहकार्याकडून पाठिंबा मिळेल. सामाजिक प्रतिमा देखील मजबूत होईल. व्यवसाय आणि नोकरीशी संबंधित असलेल्या लोकांना फायदा होईल. या लोकांना प्रत्येक क्षेत्रामध्ये अपेक्षित यश मिळू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)