फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रामध्ये शनि देवाला न्यायाधीशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. मकर आणि कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनि आहे. शनि हा अडीच वर्षे एकाच राशीत राहतो आणि त्यानंतरच त्याची हालचाल बदलतो. सध्या तो मीन राशीत स्थित आहे. न्यायाचा कारक असलेला शनि अनेक ग्रहांशी युती करत असल्यामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग निर्माण होतात. अलीकडेच शनि वक्री झाल्याने त्याचा सर्व राशीच्या लोकांवर व्यापक परिणाम झाला. आता शनि योगामुळे केंद्र योग तयार होत आहे. हा योग ज्योतिषशास्त्रातील एक महत्त्वाची घटना आहे. शुक्र आणि शनि ग्रह हे न्यायाचा देवता असल्याने 1 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 07.01 वाजता एकमेकांपासून 90 अंशांवर येतील. त्यामुळे या दोन्ही ग्रहांमुळे केंद्र योग तयार होईल त्याचा परिणाम काही राशीच्या लोकांवर होताना दिसून येतो. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी
केंद्र योगामुळे मेष राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळू शकते. दीर्घकाळापासून प्रलंबित राहिलेली काम पूर्ण होऊ शकतात. या काळात तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे तु्म्हाला अपेक्षित फायदा होईल. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळतील. नातेसंबंधांसाठी हा काळ या राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. या लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. तसेच सरकारी कामामध्ये येत असलेले संघर्ष संपतील. करिअरमध्ये प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.
या काळामध्ये मिथुन राशीचे लोक वाहन, जमीन किंवा पैसा इत्यादी संदर्भात कोणत्याही वस्तूंची खरेदी करु शकतात. तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वादही सोडवले जातील. कामाच्या ठिकाणी विशेष मान्यता मिळाल्याने कुटुंबात आनंद राहील. जर तुम्हाला निवडणुकीशी संबंधित कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर संधी अनुकूल मानली जाते. न्यायालयीन प्रकरणामध्ये तुम्हाला दिलासा मिळू शकतो. या काळात आरोग्याच्या समस्या दूर होतील. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील.
केंद्र योगामुळे कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक बदल होतील. नातेसंबंधांमधील वाद मिटतील. ज्यांना लग्नामध्ये अडथळे येत होते त्यांना या काळामध्ये लग्नाचे प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप शुभ असेल. नोकरी करणाऱ्या लोकांच्या पगारात वाढ होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमचा आदर वाढेल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)