फोटो सौजन्य- pinterest
श्रावण महिन्यात सोमवार, शुक्रवारप्रमाणे शनिवार देखील खूप महत्त्वाचा मानला जातो. हा दिवस भगवान शिव आणि शनिदेव या दोघांनाही समर्पित आहे. यावेळी भक्तांनी नियमांचे पालन करुन मनोभावे उपाय केल्यास शनिदेव प्रसन्न होतील. शनि साडेसातीच्या कारणामुळे ज्या लोकांना त्यांच्या कौटुंबिक जीवनात आणि नोकरी व्यवसायात अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे त्यांनी हे उपाय करणे फायदेशीर मानले जाते. श्रावण महिन्याच्या शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील आणि व्यक्तीच्या जीवनातील ताण कमी होऊ शकतो. जाणून घ्या शनिवारी कोणते उपाय करायचे.
शनिवारी सकाळी शिवलिंगावर काळे तीळ आणि पाण्याने अभिषेक करा. शनिवार आणि शनि यांचा काळ्या तिळाशी खोल संबंध असल्याचे म्हटले जाते. तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात काळे तीळ टाकून त्याचा शिवलिंगावर अभिषेक करा. यामुळे पापांपासून, शनिदोषापासून आणि आर्थिक समस्यांपासून सुटका होऊ शकते. शनि साडेसती दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो.
श्रावण महिन्यात शनिवारी शिवलिंगावर निळे फूल किंवा शमीची पाने अर्पण केल्याने शनिचा अशुभ प्रभाव दूर होतो. ज्यांच्या कुंडलीत शनिची साडेसाती किंवा धैय्या आहे त्यांनी हा उपाय करणे खूप फायदेशीर ठरते. शास्त्रांमध्ये शनिदेवाचे फूल म्हणून मानले जाते. पूजा करतेवेळी शमीची पाने अर्पण केल्याने शनिदोष दूर होतो आणि शनिदेव प्रसन्न देखील होतात अशी मान्यता आहे.
श्रावण महिन्यातील शनिवारी सकाळी शिवलिंगाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. हा दिवा शिवलिंगाच्या उजव्या बाजूला लावावा. तसेच ओम शनिश्चराय नमः या मंत्रांचा 10 किंवा 108 वेळा जप करावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यासोबतच आजार आणि अडथळ्यांपासून संरक्षण होते.
श्रावण महिन्यातील शनिवारी सकाळी स्नान केल्यानंतर शुद्ध गाईच्या दुधात थोडेसे केशर मिसळून मंत्रांसह शिवलिंगावर अर्पण करावे. जर वैवाहिक जीवनात सतत भांडणे, मतभेद किंवा वियोगाची परिस्थिती असल्यास हा उपाय करणे फायदेशीर ठरु शकते. केशर आणि दुधाच्या मिश्रणाने लक्ष्मी तत्व सक्रिय करते, ज्यामुळे संपत्ती आणि समृद्धीचा प्रवाह वाढतो.
श्रावण महिना हा महादेवाच्या पूजेसाठी सर्वात पवित्र महिना मानला जातो तर शनिवारचा दिवस शनिदेवाला समर्पित आहे. श्रावण महिन्यातील शनिवारी जर शमीची पूजा केल्याने शनिच्या वेदना, साडेसाती, धैय्या आणि सर्व अडथळ्यांपासून मुक्तता मिळते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)