फोटो सौजन्य- pinterest
आज रविवार, 29 जून आजच्या ग्रहांच्या हालचालीनुसार चंद्राचा प्रभाव सर्व मूलांकांच्या लोकांवर दिसून येईल. ज्योतिषशास्त्रानुसार मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आज आत्मविश्वास वाढलेला राहील. तसेच कामाच्या ठिकाणी हे लोक नेतृत्वाची भूमिका बजावू शकतात. काही लोकांना निर्णय घेताना अडचणी येऊ शकतात. मूलांक 1 ते 9 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आज आत्मविश्वास वाढलेला राहील. कामाच्या ठिकाणी हे लोक नेतृत्वाची भूमिका बजावू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाचा ताण येऊ शकतो यामुळे तुम्हाला आज थकवा जाणवू शकतो. मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. या लोकांच्या मनात अनेक प्रकारच्या भावना येऊ शकतात. व्यवसाय करणारे लोक नवीन योजना आखू शकतात ज्याचा भविष्यात तुम्हाला फायदा होईल. या लोकांना मानसिक ताणही जाणवू शकतो.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. हे लोक कामाच्या ठिकाणी इतरांसमोर आपली मते मांडू शकतात. धार्मिक कार्यांशी संबंधित लोकांना यश मिळू शकते. व्यवसायामध्ये यश मिळेल.
मूलांक 4 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. या लोकांना कोणतेही काम करताना संयम बाळगावा लागेल. कोणतेही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात.
मूलांक 5 असलेले लोक कामामध्ये व्यस्त राहतील. व्यवसायात अनेक संधी उपलब्ध होतील व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अचानक संधी मिळू शकते. कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते.
मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. हे लोक जोडीदारासोबत आपला वेळ घालवतील. या लोकांच्या करिअरमध्ये वाढ होईल. कोणत्याही कामामध्ये कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. हे लोक एखाद्या विषयावर खोलवर चर्चा करु शकतात. धर्म आणि अध्यात्मात तुमची आवड वाढेल. वैयक्तिक आयुष्यात कोणाशीही बोलताना काळजी घ्या. एखाद्यावर जास्त विश्वास ठेवल्याने नुकसान होऊ शकते.
मूलांक 8 असलेले लोक कामाच्या ठिकाणी व्यस्त असतील. कोणतेही काम करताना हुशारीने करा. आर्थिक बाबतीत कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. निर्णय घेताना घाई केल्यास नुकसान होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांची अपुरी राहिलेली कामे आज पूर्ण होतील.
मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी धाडसी निर्णय घेऊन तुम्हाला मोठे फायदे मिळू शकतात. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)