फोटो सौजन्य- istock
आजचा बुधवारचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी विशेष असणार आहे. आजचा बुधवारचा अधिपती ग्रह बुध राहील. बुधाचा अंक 5 मानला जातो. आज सर्व अंकांच्या लोकांवर गुरूचा प्रभाव दिसून येईल. मूलांक 3 असलेल्या लोकांना व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. तसेच नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तसेच मूलांक 5 असलेल्या लोकांना सरकारी कामामध्ये अपेक्षित यश मिळू शकते आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या
मूलांक 1 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. या लोकांना कामाशी संबंधित एखाद्या गोष्टीची चिंता असू शकते. मात्र तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्या कोणत्याही अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकतात. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल.
मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे तुम्हाला अपेक्षित फळ मिळेल. व्यवसायाच्या निमित्ताने तुम्हाला बाहेर जावे लागेल. त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो. तुम्हाला आज थोडे अस्वस्थ वाटू शकते.
मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी कोणतेही निर्णय घाईघाईने घेणे टाळावे. जर एखादे काम अडखले असेल ते आज पूर्ण होईल. नोकरी करणाऱ्यां लोकांना काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. व्यवसायात चांगला व्यवहार होण्याची शक्यता आहे.
मूलांक 4 असलेल्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. वैयक्तिक संबंधांमध्ये काही तणाव निर्माण होऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. तुम्हाला घरातील काही कामांमध्ये वेळ घालवावा लागू शकतो आणि पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती स्खिर राहील.
मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला कोणत्याही सरकारी नोकरीत यश मिळू शकते. तुम्हाला तुमच्या भावांसोबत किंवा मित्रांसोबत कोणत्याही विषयावर वाद घालणे टाळावे लागेल.
मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या गुंतागुंतीच्या प्रकरणात अडकणे टाळावे लागेल. आज व्यावसायिकांना फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती स्थिर राहील.
मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला इतरांवर जास्त विश्वास ठेवणे टाळावे लागेल, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. व्यवसायाच्या बाबतीत योग्य निर्णय घेणे आवश्यक राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती एखादा महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण करू शकतात.
मूलांक असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. वडिलांसोबत एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. शिक्षण आणि करिअरच्या बाबतीत तुम्हाला तुमच्या वडिलांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत निर्णय घेताना घाई करु नका. बऱ्याच काळापासून असलेल्या मानसिक ताणतणाव आणि चिंतांपासूनही आराम मिळेल. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून आणि पतीकडून फायदा होऊ शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)