फोटो सौजन्य- pinterest
आजचा बुधवारचा दिवस काही मुलांकांच्या लोकांसाठी विशेष राहील. आजचा बुधवारचा अंक 6 आहे. त्यामुळे त्यांचा स्वामी ग्रह शुक्र आहे. यामुळे शुक्राचा प्रभाव सर्व मूलांकाच्या लोकांवर राहील. तसेच आज बुधवार असल्याने बुधचाही सर्व मूलांकांच्या लोकांवर प्रभाव राहील. बुधाचा अंक 5 आहे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असलेले लोक आज कामामध्ये व्यस्त राहू शकतात. तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. आपल्या बोलण्यावर लक्ष केंद्रित करावे. तुम्ही तणावात राहू शकतात. कोणालाही सल्ला देण्यापासून सावध रहा. गुंतवणूक करताना सावध राहा. नोकरी करणाऱ्या लोकांना समस्यांना तोंड द्यावे लागेल.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमची अपूर्ण कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी दुसऱ्याचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. व्यवसायात कोणताही निर्णय घेताना घरच्यांचा सल्ला घ्या.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. एखादी समस्या असल्यास त्या दूर होतील. कामाच्या ठिकाणी योजना आखून काम करणे चांगले राहील. मात्र एकत्र काम केल्याने तुमचे काम बिघडू शकते. आर्थिक लाभ होऊ शकतो.
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. एखाद्या चुकीच्या व्यक्तीसोबत योजना आखू शकता. आरोग्याची काळजी घ्यावी अन्यथा समस्या उद्भवू शकतात. तुमची अपूर्ण कामे पूर्ण होतील.
मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. एखादी परिस्थिती उद्भवल्यास तुम्हाला शांत रहावे लागेल. आज तुम्ही खरेदी करू शकता. आरोग्याची काळजी घ्यावी.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमचे अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील. ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. जे लोक नोकरी बदलण्याच्या विचारात आहे त्यांना फायदा होईल.
मूलांक 8 असलेल्या आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. व्यसायामध्ये आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच तुमच्यावर आज कामाचा ताण राहू शकतो. कामानिमित्त तुम्ही प्रवास करु शकता. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.
मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कार्यक्षमतेचा आणि अनुभवाचा चांगला फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तसेच सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी होणाऱ्या लोकांना अनेक संधी देखील मिळू शकतात त्याचा तुम्हाला फायदा होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)