फोटो सौजन्य- pinterest
अंकशास्त्राच्या मते, मूलांक 9चा स्वामी ग्रह मंगळ आहे. शुक्राची संख्या 6 मानली जाते. या लोकांच्या वैयक्तिक जीवनात कायम गोडवा राहील. तर मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाने भरलेला राहील. मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असलेल्या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला राहील. या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही कामाच्या ठिकाणी आपले नेतृत्व दाखवू शकतात. कोणतेही निर्णय घेताना हुशारीने घ्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. या लोकांच्या मनात अनेक प्रकारच्या भावना येऊ शकतात. कोणतेही निर्णय घेताना घाईघाईने पावले उचलू नका. नातेसंबंधामध्ये असलेले मतभेद दूर होतील.
मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कोणतेही निर्णय घेताना हुशारीने घ्या. तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. शिक्षण, लेखन, कला किंवा सादरीकरण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना यश मिळेल.
मूलांक 4 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमची प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या कामामध्ये कोणतेही अडथळे येणार नाही. सामाजिक कार्यात तुम्ही सहभागी होऊ शकतात. व्यवसायात लाभ होऊ शकतो.
मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कोणतेही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. व्यवसायात फायदा होईल. व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर जाणे होऊ शकते. कोणतेही निर्णय घेताना घाई करु नका.
मूलांक 6 असलेल्या लोकांचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. वैयक्तिक जीवनात गोडवा राहील. मानसिक ताण कमी होईल.
कला, सौंदर्य, सजावट किंवा सामाजिक कार्यात तुमची आवड वाढू शकते. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल.
मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस आनंदाचा राहील. हे लोक एखाद्या विषयावर चर्चा करु शकतात. मानसिक ताण कमी होईल. कोणाच्याही बोलण्यावर घाईघाईने प्रतिक्रिया देण्याचे टाळावे लागेल, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.
मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करावे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी गांभीर्याने विचार करा. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील.
मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही नेतृत्वाची भूमिका बजावू शकतात. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करावा. निर्णय घेताना घाई करु नये. तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)