फोटो सौजन्य- pinterest
या वर्षीची शेवटची विनायक चतुर्थी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चौथ्या दिवशी येते. ज्यावेळी भद्रा निवासस्थान पाताळ आहे, या दिवशी प्रभावी आहे. या दिवशी पंचकदेखील असेल. या विनायक चतुर्थीला विघ्नेश्वर चतुर्थी असेही म्हणतात. विनायक चतुर्थीचे हे व्रत गणपती बाप्पाला समर्पित आहे. हे व्रत पाळल्याने आणि त्याची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून सुटकादेखील होते. विनायक चतुर्थीच्या दिवशी दुपारी गणपती बाप्पाची पूजा केली जाणार आहे, यासाठी 1 तास 52 मिनिटांचा कालावधी मिळणार आहे. पौष विनायक चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या
2025 च्या वर्षातील शेवटची विनायक चतुर्थी आहे. ही चतुर्थी पौष महिन्यात येत आहे. या चतुर्थी तिथीची सुरुवात 23 डिसेंबर रोजी दुपारी 12.12 वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती 24 डिसेंबर रोजी दुपारी 1.11 वाजता होणार आहे. अशा वेळी विनायक चतुर्थीचे व्रत 24 डिसेंबर रोजी पाळले जाणार आहे.
विनायक चतुर्थीच्या दिवशी दुपारी गणपती बाप्पाची पूजा केली जाणार आहे. या दिवशी पूजा करण्यासाठी मुहूर्त सकाळी 11.19 ते दुपारी 1.11 वाजेपर्यंत असणार आहे. यावेळी ब्रम्ह मुहूर्त सकाळी 5.22 ते 6.16 असणार आहे. तर अभिजित मुहूर्त राहणार नाही. या शुभ काळात पूजा करणे खूप फायदेशीर ठरणार आहे. या दिवशी शुभ योगदेखील तयार होणार आहे. यावेळी हर्षण योग पहाटेपासून दुपारी 4.2 वाजेपर्यंत असणार आहे. त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत प्रभावी असणार आहे.
वर्षातील शेवटची विनायक चतुर्थीच्या दिवशी भद्रा आणि पंचक असणार आहे. यावेळी भद्राची सुरुवात सकाळी 7.11 वाजता होणार आहे आणि दुपारी 1.11 वाजेपर्यंत हा कालावधी असेल. यावेळी राहू काळ दुपारी 12.21 ते 1.38 पर्यंत असणार आहे. तसेच पंचक दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6.46 ते सकाळी 7.12 पर्यंत असणार आहे. बुधवारपासून सुरू होणाऱ्या पंचकाला राजपंचक असे म्हटले जाते. हे पंचक अशुभ मानले जात नाही.
सकाळी लवकर उठून आवरुन झाल्यानंतर लाल किंवा पिवळ्या रंगांचे कपडे परिधान करा. पूजा करताना मन आणि वातावरण दोन्ही शुद्ध ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती गंगाजलाने स्वच्छ करुन घ्या. त्यानंतर दिवा लावून घ्या. नंतर पाण्याने गणपती बाप्पाचा अभिषेक करा. त्यानंतर लाल चंदनाचा टिळक लावा. नंतर गणपती बाप्पाला 21 दुर्वा आणि लाल फुले अर्पण करा. पूजा झाल्यानंतर मोदक आणि बेसनाचे लाडूचा नैवेद्य दाखवू शकता. ॐ गं गणपतये नमः या मंत्रांचा 108 वेळा जप करावा. त्यानंतर गणपती बाप्पाची आरती करुन घ्यावी.
विनायक चतुर्थीला उपवास आणि गणेशाची पूजा केल्याने तुमच्या जीवनात शुभता येते. गणेशाच्या आशीर्वादाने सर्व प्रयत्न यशस्वी होतात आणि अडचणी दूर होतात. या दिवशी पूजा करताना गणेशाला दुर्वा अवश्य अर्पण करा. दरम्यान, या दिवशी चंद्राचे दर्शन घेऊ नये.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: पौष महिन्यातील विनायक चतुर्थी ही शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. ही तिथी दरवर्षी पंचांगानुसार बदलते, त्यामुळे अचूक तारीख जाणून घेण्यासाठी त्या वर्षाचे पंचांग पाहणे आवश्यक असते
Ans: विनायक चतुर्थी हा भगवान श्रीगणेशांचा विशेष दिवस मानला जातो. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्यास विघ्नांचा नाश होतो, कार्यसिद्धी मिळते आणि घरात सुख-समृद्धी वाढते अशी श्रद्धा आहे.
Ans: अनेक भक्त विनायक चतुर्थीला उपवास करतात. उपवास शक्य नसेल तर सात्त्विक आहार घेऊन गणेश नामस्मरण करणेही पुण्यदायी मानले जाते.






