फोटो सौजन्य - Social Media
चंद्रासारखी लोकं! म्हणजेच मूलांक २! ज्या व्यक्तींचा जन्म महिन्याच्या २, ११, २० किंवा २९ तारखेला होता, त्यांचा मूलांक २ असतो. यांचा स्वभाव अगदी चंद्रासारखा असतो. चंद्र कसा लोकांना आकर्षित करतो. तसेच काही मूलांक २ असणाऱ्यांचे असते. जर तुम्ही मूलांक २ आहात तर तुम्ही फार जास्त भावनिक आहात. तुम्ही प्रत्येक गोष्टीत भावनिक होता. तुम्ही फार संवेदनशील आहात. मुळात, या भावना सकारत्मकही असू शकतात, कारण तुम्ही सच्चे आणि इमानदार आहात. कामाशी प्रामाणिक आहात. आकर्षक आहात. पण याचा नकारत्मक प्रभाव म्हणजे कधी कधी जास्त भावनिक असल्यामुळे स्वतःलाच त्रास करून घेता. जास्त भावनिक असल्यामुळे कधी काळी मानसिक त्रासाचीही शक्यता अमाप आहे.
मूलांक २ म्हणजे मूड चेंजिंग मशीन! कधी फार खुश तर कधी खिन्न! मुळात, हा चंद्राचा प्रभाव आहे. भरती ओहोटीप्रमाणे तुमच्यावरही तो जाणवत असतो त्यामुळे फार काही टेन्शन घेण्याची मुळीच गरज नाही. तुम्ही बोलण्यात अगदी सौम्य आहात. तुमचे वर्तन अगदी प्रेमळ आहे. तुम्ही कल्पकतेमध्ये हुशार आहात. कलाकार आहात. सयंमी आणि समजूतदार आहात. शांत असलात तरी तुम्ही उत्स्क्रुष्ट आहात.
जोडीदार ठरवायचा असेल तर मूलांक १ म्हणजेच सूर्याशी तुमची परफेक्ट गट्टी जमते. तुमचा शांत स्वभाव अगदी सूर्याच्या गरमीलाही शांत करून टाकेल.
एकंदरीत, मूलांक २ चे लोक म्हणजे चंद्रासारखे गुण बाळगणारे! सौम्य, संवेदनशील आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेले. जरी त्यांच्या मनात अस्थिरता असली, तरी त्यांच्या प्रेमळ वर्तनामुळे ते लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करतात. जीवनातील यशासाठी त्यांना आत्मविश्वास आणि स्थैर्य वाढवण्याची गरज असते. जेव्हा ते हे साध्य करतात, तेव्हा त्यांच्या आयुष्याचा प्रकाश चंद्राप्रमाणे सर्वत्र झळकतो.