फोटो सौजन्य- pinterest
रविवार, 10 ऑगस्टपासून काही राशीच्या लोकांना सावध राहावे लागेल. राहू आणि चंद्र कुंभ राशीत असल्याने युती करणार आहे. यामुळे काही राशीच्या लोकांना नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे.
रविवार, 10 ऑगस्ट रोजी चंद्र पहाटे २:१० वाजता कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि राहूशी युती करेल. ज्योतिषशास्त्रात चंद्राला मन आणि भावनांचा प्रतीक मानले जाते आणि राहूला गोंधळ आणि अचानक बदलांचा कारक मानले जाते. तर शनि हा कुंभ राशीचा स्वामी आहे. ज्यावेळी चंद्र आणि राहू कुंभ राशीत युती करतात त्यावेळी काही राशींसाठी समस्या निर्माण होऊ शकतात. याला ‘ग्रहण योग’ असेही म्हणतात. ज्यामुळे मानसिक अस्वस्थता, चुकीचे निर्णय आणि नातेसंबंधांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. चंद्र-राहुच्या युतीमुळे कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी, जाणून घ्या
कर्क राशीच्या कुंडलीमध्ये ही युती आठव्या घरात होईल. याचा संबंध जोखीम, रहस्य आणि बदलाशी संबंधित आहे. यावेळी तुम्हाला अचानक आर्थिक नुकसान होऊ शकते. जसे की गुंतवणुकीतील चुका किंवा अनावश्यक खर्च. त्याचसोबच पोटाशी संबंधित समस्या किंवा आरोग्यामध्ये मानसिक ताण येऊ शकतो. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून तणाव किंवा गैरसमज देखील होऊ शकतात.
तूळ राशीच्या कुंडलीमध्ये ही युती पाचव्या घरात होईल. याचा संबंध प्रेम, सर्जनशीलता आणि मुलांशी संबंधित आहे. या काळात नात्यामध्ये गैरसमज होऊ शकतात. अभ्यासात अडथळा येऊ शकतो किंवा मुलांशी संबंधित चिंता वाढू शकतात. गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता देखील आहे.
कुंभ राशीच्या कुंडलीमध्ये ही युती पहिल्या घरामध्ये होणार आहे. त्यामुळे या व्यक्तीमधील व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वासाशी संबंधित आहे. या काळामध्ये कुंभ राशीच्या लोकांना मानसिक ताण, अस्वस्थता आणि आत्मविश्वासाचा अभाव जाणवू शकतो. नोकरी करणाऱ्यांनी घाईमध्ये कोणतेही निर्णय घेऊ नये. झोपेचा अभाव किंवा ताण इत्यादी आरोग्याशी संबंधित समस्या जाणवू शकतात.
मीन राशीच्या कुंडलीमध्ये ही युती बाराव्या घरामध्ये होणार आहे. याचा संबंध खर्च, नुकसान आणि एकाकीपणाशी संबंधित आहे. या काळामध्ये तुम्हाला पैशाचे नुकसान, अनावश्यक खर्च किंवा मानसिक अस्वस्थता येऊ शकते. परदेश प्रवासात अडथळे यासारख्या समस्या येऊ शकतात. या काळामध्ये तुम्हाला एकटे वाटू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)