फोटो सौजन्य- pinterest
आज रविवार 28 डिसेंबरचा दिवस. आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी म्हणजे आज शाकंभरी नवरात्रोत्सवाची सुरुवात होणार आहे. यासोबत चंद्र आणि मंगळ गुरु केंद्र योग तयार करेल. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ आणि चंद्रामुळे धनलक्ष्मी योग तयार होईल. यावेळी उत्तराभाद्रपद नक्षत्रामुळे रवि योग आणि सर्वार्थ सिद्ध योग तयार होईल. रवी योग आणि लक्ष्मी योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. जुने मित्र भेटतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. आई वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. वडिलांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. वडिलांकडून तुम्हाला अपेक्षित फायदा होईल. तुमच्यामधील असलेल्या कलेचा तुम्हाला फायदा होईल. तुमचे महत्त्वाचे काम पूर्ण होईल. तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकता.
सिंह राशींच्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. सामाजिक कामामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. त्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. व्यवसायाशी संबंधित असलेल्या लोकांना फायदा होईल. तुम्हाला मित्र किंवा जुन्या ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने फायदा होईल. वडिलोपार्जित व्यवसायात गुंतलेल्यांना अपेक्षित यश मिळेल.
तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. तुम्ही मित्रांसोबत वेळ घालवाल. चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. स्पर्धा आणि शैक्षणिक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. काही चांगली बातमी मिळण्याचीही शक्यता आहे. नातेवाईक घरी येऊ शकतात.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला मित्रांकडून पाठिंबा मिळेल. कौटुंबिक जीवनात असलेला तणाव दूर होईल. वैवाहिक जीवन चांगले राहील. तुमच्या मुलांकडून तुम्हाला आनंद मिळेल. आज तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. मालमत्तेच्या बाबतीत तुम्हाला यश मिळेल. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुमचे कोणतेही काम अडकले असेल तर ते वेळेवर पूर्ण होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






