फोटो सौजन्य- pinterest
आज सोमवार, 29 डिसेंबरचा दिवस. आजचा दिवस महादेवांना समर्पित आहे आणि आज दिवस रात्र चंद्र संक्रमण करणार आहे. या संक्रमणाचा काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार वर्षाच्या शेवटच्या सोमवारी रवि योग आणि शिव योगदेखील तयार होत आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व आणखी वाढणार आहे. यावेळी शुभ योगाचा लाभ काही राशीच्या लोकांना मिळणार आहे. तसेच तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. सोमवारी शुभ योगाचा फायदा कोणत्या राशीच्या लोकांना होणार आहे जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक राहील. तुमची आज सर्व कामे पूर्ण होतील. जर तुमचे पैसे अडकले असतील तर ते तुम्हाला परत मिळतील. या पैशांची गुंतवणूक तुम्ही व्यवस्थितरित्या करु शकता. जर तुम्हाला घर किंवा फ्लॅट खरेदी करायचा असेल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला इतर स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नातूनही पैसे मिळतील. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. खूप मेहनत घेतल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या ज्ञानातही वाढ होईल. जर तुम्ही कोणत्याही वादात अडकला असाल तर त्यातून आज सुटका होईल. तुम्ही नवीन वर्षात कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन देखील करू शकता. तुम्ही मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायामध्ये नवीन योजना आखू शकतात त्याचा तुम्हाला फायदा होईल. मालमत्तेत गुंतवणूक करणे फायदेशीर राहील.
कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्ही घर किंवा वाहन खरेदी करु शकता. नवीन वर्षासाठी काही योजना देखील बनवू शकाल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला राहील. यावेळी कन्या राशीच्या लोकांना शिवयोगाचा फायदा होणार आहे. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याची काळजी घ्यावी.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहणार आहे. मित्रांसोबत नवीन वर्ष साजरे करण्यासाठी प्रवास करू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. करिअर सुरू करण्याची संधी मिळू शकते. नातेसंबंध चांगले राहतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल.
मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहणार आहे. आईसोबत बाहेर जाण्याची शक्यता. जोडीदारासोबतचे नाते चांगले राहील. धार्मिक ठिकाणी फिरायला जाऊ शकता. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. नातेवाईकांचा अपेक्षित पाठिंबा मिळेल. आर्थिक अडचणींवर तुम्ही मात कराल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






