फोटो सौजन्य- pinterest
वर्षातून एकदा कुलस्वामिनीचे (कुलदेवी) दर्शन घेणे हे कुळाचे रक्षण, उन्नती आणि पूर्वजांचे आशीर्वाद टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कुलदेवी आपल्या वंशाची अधिष्ठात्री देवता असल्याने वर्षातून एकदा तिच्या दरबारी जाऊन दर्शन घेतल्याने कुटुंबावर तिची कृपा राहते, संरक्षण मिळते आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होऊन कुळाचा उद्धार होतो असे मानले जाते. वर्षातून एकदा कुलस्वामिनीचे दर्शन घेण्यामागील काय रचना आपल्या ऋषीमुनींनी केली, जाणून घ्या
‘कुल’ आणि ‘देवता’ या दोन शब्दांनी मिळून ‘कुलदेवता’ हा शब्द बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधारचक्रातील कुंडलिनीशक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता असं पुराणात म्हटलंय.
कुलदेवता ज्यावेळी पुरुषदेवता असते, त्यावेळी तिला ‘कुलदेव’ आणि जेव्हा ती स्त्रीदेवता असते, तेव्हा तिला ‘कुलदेवी’ म्हणून संबोधले जाते.
कुलदेवत हे आपल्या कुळाचे आणि वंशाचे संरक्षण करणारे देवत असतात. बहुतेक करून, कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी पूर्वी वास्तव्यास होते, त्या प्रदेशानजीकच्या परिसरातील प्रसिद्ध देवत हे प्रामुख्याने, त्यांचे ‘कुलदेवत’ असतात. त्यासाठी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवी/कुलदेवत यांच्या स्थानी जाऊन दर्शन घ्यावं असं म्हटलं जातं.
कुलदेवी आपल्या कुळाची रक्षणकर्ता असते. दर्शनामुळे कुटुंबावर येणारी संकटे टळतात अशीच अनेक श्रद्धाळूंची धारणा असते. तसेच देवीचा भक्कम आशीर्वाद पाठीशी राहतो. त्यामुळे आपली उन्नती होते.
प्रत्येक कुळाचे पूर्वज ज्या दैवताची आराधना करत आले आहेत, ते कुलदैवत असते. दरवर्षी दर्शनाला जाऊन आपण त्या परंपरा आणि मूळ शक्तीशी जोडलेले राहतो. आपल्या आपल्या मूळ ठिकाणी त्यामुळे किमान एकदिवसीय तरी जाणे होते. आपल्या कुलदेवतेसोबतच आपल्या आप्तेष्टजणांचीही त्यामुळे भेट होते.
विवाह, मुंज किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला कुलदेवतेला बोलावणे (आमंत्रण), नैवेद्य दाखवणे आणि कुलाचार करणे अनिवार्य असते. यामुळे कुळाची प्रगती होते. तसेच कुलदेवीची उपासना किंवा दर्शनामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरातील सदस्यांची आध्यात्मिक आणि भौतिक उन्नती होते.
महाराष्ट्रात अनेक जण तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका किंवा सप्तशृंगी माता यांना कुलस्वामिनी मानतात. या ठिकाणी जाऊन दर्शन घेणे हे आत्मिक शांतीसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे याठिकाणी वर्षभर भाविक जात असतात. आपल्या परिवारासह तेथे गेल्याने पारिवारिक आनंदही प्राप्त होतो.
जर कुलस्वामिनी कोणती हे माहीत नसेल, तर घरातील मोठ्या मंडळींना विचारून किंवा कुलाचारावरून ती शोधून काढावी. अनेकांना जर माहिती नसेल तर आपल्या परिवाराचा इतिहास, कुंडली किंवा अन्य मार्गाने शोधून कुलदैवतेचा शोध घ्यावा आणि नित्यनियमाने वर्षातून एकदा तरी तिच्या स्थानी दर्शन घ्यावे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: कुलदेवता म्हणजे आपल्या कुटुंबाची किंवा वंशाची मुख्य देवता. ही देवता पिढ्यान्पिढ्या पूजली जाते आणि कुटुंबाचे रक्षण करते असे मानले जाते.
Ans: परंपरेनुसार वर्षातून किमान एकदा कुलदेवतेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने देवतेचे आशीर्वाद मिळतात आणि कुटुंबावर कृपा राहते.
Ans: धर्मशास्त्रानुसार कुलदेवता ही आपल्या वंशाची रक्षक मानली जाते. तिच्या पूजेमुळे पितृऋण कमी होते आणि जीवनातील अडथळे दूर होतात.






