(फोटो सौजन्य: Ai Created)
स्वयंपाकघरात मदत करा
आपली आई वर्षांचे ३६५ दिवस घरातील काम करत असते. तिलाही कधीही यात सुट्टी मिळत नाही. अशात घरातल्या कामात जर तुमचा थोडा हातभार लागला तर यामुळे तुमच्या आईची बरीच मेहनत वाचू शकते आणि तिला आरामासाठी किंवा तिच्या आवडीच्या इतर गोष्टींसाठी वेळ मिळू शकतो. मातृदिनानिमित्त घरात काही खास पदार्थ तयार करुन, आईला घरकामात मदत करुन तुम्ही तिला खुश करु शकता. घरातील कामे करुन तिला एक दिवस स्वत:सारखा एन्जाॅय करु द्या. तिला हे जाणवून द्या की आजचा दिवस फक्त तिचा आहे.
मनमोकळ्यापणाने गप्पा मारा
वाढत्या स्मार्टफोनच्या वापराने नात्यांमधील संभाषण कुठेतरी कमी केलं आहे. बऱ्याचदा आईला आपल्याला अनेक गोष्टी सांगायच्या असतात पण आपला मोकळा वेळ तिला मिळत नाही. जुन्या आठवणींना उजाळा देत आईसोबत गप्पा मारा, बालपणाच्या काही खोडी आईला सांगा, तिच्या आवडीनिवडी तिला विचारा आणि अशा अनेक गोष्टींवर चर्चा करा ज्यावर बसून तुमच्यात संभाषण झालेलं नाही. आईला आपल्या स्वप्नांविषयी विचारा, तिला विचारा की अशी कोणती नवीन गोष्ट तिला करायची आहे, शिकायची आहे किंवा कुठे फिरायला जायचं आहे का…
अपूर्ण इच्छा पूर्ण करा
प्रत्येक आईची काही स्वप्ने असतात, जी अनेकदा घर आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांखाली दडपली जातात. काहींना चित्रकला आवडते, काहींना बागकाम तर काहींना नृत्य करायला आवडते. मातृदिनानिमित्त आपल्या आईची अशी कोणती गोष्ट अपूर्ण राहिली आहे जी तिला पूर्ण करण्याची इच्छा आहे हे तिला विचारा आणि ही इच्छा पूर्ण करण्यात तिची मदत करा.
Recipe : उरलेल्या शिळ्या भाताला फेकू नका, त्यापासून बनवा कुरकरीत भजी, रेसिपी नोट करा
वेलनेस प्लॅन तयार करा
अनेकदा घराची काळजी घेताना आई स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करते. अनेक किरकोळ समस्या त्रास तर देत असतात पण त्यासाठी डाॅक्टरांकडे जाणे ती टाळत असते. मातृदिनी आईच्या आरोग्याची काळजी घ्या आणि तिला त्रास होत असल्यास डाॅक्टरांकडे चेकअपसाठी घेऊन जा. अनेकदा किरकोळ वेदना पुढे गंभीर समस्यांचे कारण ठरतात त्यामुळे आईच्या वेदनांकडे दुर्लक्ष करु नका आणि तिची तपासणी करा. तिला योगा, व्यायम करण्यास प्रोत्साहित करा. तुम्ही तिला हेल्थ क्लबचे सदस्यत्वही मिळवून देऊ शकता.






