फोटो सौजन्य- pinterest
शनिदेव सध्या मीन राशीमध्ये आहे. मात्र तो 3 ऑक्टोबर रोजी रात्री 9.49 वाजता पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या बदलाचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर विविध प्रकारे होणार आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ ठरणार आहे. गुरु हा पूर्वभाद्रपद नक्षत्राचा स्वामी आहे आणि शनिच्या या संक्रमणामुळे काही राशीच्या लोकांना विवाहातील अडथळ्यांपासून सुटका होईल तर आर्थिक लाभाच्या संधी आणि करिअरमध्ये सकारात्मक परिणाम मिळू शकतात. याशिवाय या काळात जीवनात नवीन ऊर्जा आणि आनंद देखील येऊ शकतो.
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ असणार आहे. या काळात करिअरमधील योजनांना गती मिळेल. तुम्हाला एखाद्या वरिष्ठ सदस्याचे आशीर्वाद मिळतील, ज्याच्या प्रभावामुळे व्यवसाय पुढे नेण्यास मदत होईल. तुमच्या नात्यांमधून तुम्हाला प्रेम मिळेल. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. तसेच सामाजिक क्षेत्रातही तुमची वेगळी ओळख तयार होईल. या काळात तुमच्या अपूर्ण इच्छा देखील पूर्ण होतील. तुमचे आरोग्य सामान्य राहील. जर तुम्ही कर्जाच्या समस्येमध्ये अडकल्या असाल तर तुम्हाला आराम मिळते. या काळात तुमची मानसिक स्थिती संतुलित राहील.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ सामान्य राहील. यावेळी जमीन आणि मालमत्तेशी संबंधित तुमचा वाद सोडवला जाऊ शकतो. त्याचसोबत या राशीची लोक व्यवसाय आणि इतर काही कामाची सुरुवात करु शकतात. वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर तुम्हाला संतुलन आणि समाधान मिळेल. प्रेमसंबंधामध्ये हे लोक मजबूत राहतील. तुम्हाला सहलीला जावे लागू शकते. तुम्हाला तुमच्या संघर्षांचे फळ मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून किंवा व्यवहारातूनही तुम्हाला अपेक्षित नफा मिळू शकतो.
मीन राशीच्या लोकांना या काळामध्ये वर्डिलोपार्जित संपत्तीचा लाभ होऊ शकतो. शनिच्या कृपेने नशीब तुमच्या बाजूने राहील. प्रेमप्रकरणात आनंद आणि जवळीक राहील. जर तुम्ही घर, दुकान खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मार्गातील अडथळे दूर होतील. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होताना दिसून येतील. या काळात तुमचे मानसिक संतुलन चांगले राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)