फोटो सौजन्य- pinterest
शनिदेवाला कर्माचे फळ देणारा आणि न्यायाचा देव म्हणून ओळखला जातो. तो व्यक्तींना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला सर्वात क्रूर ग्रह मानले जाते. शनि सर्वात मंद गतीने फिरतो. तो दर अडीच वर्षांनी राशी बदलतो. ज्योतिषशास्त्रात, शनि हा दोन राशींचा स्वामी मानला जातो. मकर आणि कुंभ. त्याचप्रमाणे, शनि हा तीन नक्षत्रांचा स्वामी मानला जातो.
राशी बदलांसोबतच, शनिदेव नक्षत्र देखील बदलतात, ज्याचा परिणाम देश आणि जगासह सर्व राशींवर होतो. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाशी संबंधित तीन नक्षत्रांचे वर्णन करण्यात आले आहे. शनिदेवाचे हे तीन नक्षत्र कोणते आणि शुभ अशुभ कोणते ते जाणून घ्या
शनिदेवाचे पहिले नक्षत्र पुष्य आहे. हे नक्षत्र पूर्णपणे कर्क राशीत आहे. ज्योतिषशास्त्रात, हे सर्व नक्षत्रांमध्ये सर्वात शुभ आणि पवित्र मानले जाते. या नक्षत्रात जन्मलेले लोक हुशार, संयमी आणि कर्तव्यनिष्ठ मानले जातात. या नक्षत्राखाली असलेले लोक अत्यंत धार्मिक असतात. त्यांच्यात वाढ आणि विकासाची प्रबळ क्षमता असते. ते संकटातून लवकर सावरतात. या नक्षत्रात शुभ कार्य करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानला जातो. व्यापार, गृहप्रवेश, खरेदी विक्री, नवीन कामासाठी शुभ मानला जातो.
शनिदेवाचे दुसरे नक्षत्र अनुराधा आहे. हे नक्षत्र वृश्चिक राशीत येते. या नक्षत्राला यशाचे प्रतीक मानले जाते. या नक्षत्रात जन्मलेले लोक धाडसी, ऊर्जावान आणि प्रभावशाली असतात. या लोकांची परदेशात उत्तम प्रगती होते. त्यांची प्रबळ इच्छाशक्ती त्यांना जीवनात लक्षणीय प्रगती करण्यास मदत करते. या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे हे लोक लोकसंबंध निर्माण करण्यास कुशल असतात त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण आणि संघटनकौशल्य असते. धैर्य, चिकाटी आणि जबाबदारी असावी. हा काळ आध्यात्मिक विकासासाठी उपयुक्त असतो.
शनिचा उत्तराभाद्रपद नक्षत्र मीन राशीमध्ये येते. हा नक्षत्र उर्जेचा नक्षत्र मानला जातो. या नक्षत्रात जन्मलेले लोक दयाळू, समृद्ध आणि आनंदी असतात. त्यांच्याकडे उल्लेखनीय आध्यात्मिक क्षमता आणि ज्ञान असते. हे नक्षत्र अंतर्मुख, तत्वनिष्ठ आणि ज्ञानुप्रेमी स्वभावाचे असते. या नक्षत्राचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे या नक्षत्रात अध्यात्म आणि तत्वज्ञानाची आवड असते. शांत, गंभीर आणि विचारशील स्वभाव असतो. संकटामध्ये स्थिर राहण्याची देखील क्षमता असते. तसेच आदर, नैतिकता आणि प्रतिष्ठा देखील असते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: शनि देवाच्या अधिपत्याखाली पुष्य, अनुराधा, उत्तराभाद्रपद ही तीन नक्षत्रे येतात
Ans: पुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ, पवित्र आणि सर्वार्थसिद्ध मानले जाते. शुभ कार्याचा आरंभ, खरेदी, गृहप्रवेश यासाठी हे नक्षत्र अत्यंत शुभ मानले जातात
Ans: अनुराधा नक्षत्र हे मैत्री, संतुलन आणि यशाचे प्रतीक आहे.






