फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये प्रत्येक तिथी आणि दिवसाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यामध्ये दोन तिथी येतात. एक शुक्ल पक्षामध्ये तर दुसरी कृष्ण पक्षामध्ये. प्रत्येक तिथीला स्वतःचे असे विशिष्ट महत्त्व प्राप्त झाले आहे. परंतु वर्षामध्ये येणाऱ्या 24 एकादशींपैकी कामिका एकादशीला विशेष महत्त्व आहे. कारण ही तिथी श्रावण महिन्यातल्या कृष्ण पक्षात येते.
या तिथीच्या दिवशी भक्तांनी अगदी मनोभावे पूजा करुन उपवास केल्यास भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. यावेळी कामिका एकादशीच्या दिवशी विशेष योग देखील तयार होत आहे. गुरु पुष्य योग, सर्वार्थ सिद्धि योग आणि अमृत सिद्धि योग तयार होत आहे. त्यामुळे या दिवसाला आणखी विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदा कामिका एकादशी कधी आहे, शुभ मुहूर्त, योग आणि महत्त्व जाणून घ्या
पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात रविवार, 20 जुलै रोजी सुरु होत आहे. एकादशी तिथीची सुरुवात रविवार, 20 जुलै रोजी दुपारी 12.12 वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती सोमवार, 21 जुलै रोजी सकाळी 9.38 वाजता होईल. उद्यतिथीनुसार कामिका एकादशीचे व्रत सोमवार, 21 जुलै रोजी पाळले जाणार आहे.
श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला वृद्धी आणि ध्रुव योग एकत्रितपणे तयार होत आहे. यासोबतच इतर अनेक योग तयार होत आहे. असे म्हटले जाते की, या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा केल्याने भक्तावर धनदेवतेचा आशीर्वादाचा वर्षाव होतो. भक्तांने यावेळी आंघोळ झाल्यानंतर ध्यान करावे. तसेच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी.
कामिका एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करुन स्वच्छ कपडे परिधान करावे
त्यानंतर चौरंगावर कापड पसरवून भगवान विष्णूच्या मूर्तीची स्थापना करावी
नंतर पिवळी फुले, धूप, दिवा, चंदन अर्पण करावे. नंतर नैवेद्य दाखवावा.
यावेळी तुळशीच्या पानांना विशेष महत्त्व असल्याने पूजेमध्ये त्यांचाही समावेश करावा.
पूजा करुन झाल्यानंतर विष्णूच्या मंत्रांचा जप आणि सहस्रनामाचे पठण करावे.
हे सर्व झाल्यानंतर आरती करुन घ्यावी आणि केशर किंवा मखनाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.
कामिका एकादशीचे व्रत हे भगवान विष्णू यांना समर्पित आहे. धार्मिक मान्यतेनुसार, हे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. पुत्रदा एकादशीचे व्रत संतती प्राप्तीसाठी विशेष करुन पाळले जाते. तसे कामिका एकादशीचे व्रत पापांपासून मुक्ती मिळविण्यासाठी केले जाते, अशी मान्यता आहे. कामिका एकादशीच्या दिवशी तुळस, शंख आणि गंगाजलाने भगवान विष्णूंची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)