फोटो सौजन्य- pinterest
श्रावण महिन्याचे महत्त्व हे भगवान शिवाच्या उपासनेसोबत आणि भक्तीसाठी विशेष आहे. हा महिना भगवान शिवाला समर्पित असल्याने या काळामध्ये भक्त विविध प्रकारे त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. पूजा, उपवास आणि जलाभिषेक सोबतच यावेळी रंगांनाही विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव यांचे आवडते रंग कोणते आणि या रंगामागील धार्मिक महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया.
हिरवा रंग हा निसर्ग, हिरवळ वाढ आणि प्रजनन क्षमता यांचे प्रतीक आहे. श्रावन महिन्यात पावसाळा असल्याने जेव्हा निसर्ग त्याच्या शिखरावर असतो. हा रंग भगवान शिवाचे नैसर्गिक स्वरूप आणि सृष्टीचे पालनपोषण करण्याची भूमिका दर्शवितो.
पौराणिक कथेमध्ये म्हटल्याप्रमाणे समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा विष बाहेर पडले तेव्हा भगवान शिव यांनी ते आपल्या घशात धरले, ज्यामुळे त्यांचा घसा निळा झाला. मात्र या विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी हिरव्या रंगांच्या औषधी वनस्पती वापरल्या गेल्या होत्या, असे म्हटले गेले आहे.
सनातन धर्मामध्ये भगवान शिवाचा संबंध पांढऱ्या रंगांशी जोडला गेलेला आहे. हा रंग भगवान शिवाला खूप प्रिय असल्याचे म्हटले जाते. पांढऱ्या रंगांला पवित्रता, स्वच्छता, शांती आणि साधेपणाचे प्रतीक मानले जाते. भगवान शिव हे एक संन्यासी आणि तपस्वी मानले जातात, जे भ्रम आणि आसक्तीपलीकडे आहेत. पांढरा रंग त्यांच्या या रूपाचे प्रतिबिंब आहे. भगवान शिवाच्या शरीरावर भस्म लावले जाते ते राखेचे शुद्ध रूप आहे. याला जगाच्या नश्वरतेचे आणि अनासक्तीचे प्रतीक देखील मानले जाते.
लाल रंग हा ऊर्जा, शक्ती, धैर्य आणि उत्साहाचे प्रतीक मानले जाते. भगवान शिव यांना वाईटाचा नाश करणारा आणि संहारक म्हणून देखील त्याची ओळख आहे. त्यामुळे विवाहित महिलांनी श्रावण महिन्यामध्ये लाल रंगांचे कपडे परिधान करावे. तसेच या रंगाला सौभाग्याचे प्रतीक देखील मानले जाते.
पिवळा रंग हा ज्ञान, बुद्धी, शुभ आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. तसेच भगवान शिवाला आदिगुरु देखील मानले जाते. पिवळ्या रंगाचा संबंध देवी पार्वतीशी आहे. त्यामुळे शिव आणि पार्वती यांच्या एकत्रितपणे पूजा करताना पिवळ्या रंगांचे विशेष महत्त्व आहे.
श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाच्या पूजेत रंगांचा वापर केवळ सौंदर्यासाठीच नाही तर त्यांच्या खोल धार्मिक महत्त्वामुळे केला जातो. वेगवेगळे रंग त्यांच्या वेगवेगळ्या ऊर्जा आणि गुणांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे या रंगांच्या वापरामुळे भगवान शिवाचे आशीर्वाद मिळविण्यासाठी केला जातो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)