फोटो सौजन्य- pinterest
सूर्य सिंह राशीत संक्रमण करणार आहे. यावेळी 18 वर्षांनी सूर्य आणि केतूची युती सिंह राशीत होणार आहे. केतू सध्या सिंह राशीमध्ये संक्रमण करत आहे. 17 ऑगस्ट रोजी सूर्य सिंह राशीत संक्रमण करेल. सूर्य आणि केतूच्या युतीमुळे ग्रहण योग तयार होईल हा योग ज्योतिषशास्त्रात खूप शुभ मानला जात नाही. मात्र सूर्य त्याच्या स्वतःच्या राशी सिंह राशीत संक्रमण करताना त्याची स्थिती मजबूत राहते त्यामुळे त्याचा परिणाम काही राशीच्या लोकांवर होताना दिसून येतो. या युतीचा फायदा मेष, सिंह राशीसह काही राशीच्या लोकांना होणार आहे. या युतीमुळे करिअरमध्ये यश मिळेल तर आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. सूर्य आणि केतुच्या युतीमुळे कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होईल, जाणून घ्या
सूर्य आणि केतूची युती मेष राशीच्या कुंडलीमध्ये पाचव्या घरामध्ये होणार आहे. या लोकांना जीवनामध्ये अपेक्षित यश मिळेल. या काळात तुमचे प्रेम जीवन पूर्वीपेक्षा चांगले राहील. ज्यांना त्यांचे नाते विवाहात रूपांतरित करायचे आहे त्यांना आता कुटुंबातील सदस्यांची मान्यता मिळू शकते. या काळात तुम्हाला उच्च शिक्षणात यश मिळू शकते. तसेच नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला राहील.
सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि केतूची युती खूप प्रभावी राहणार आहे. या काळामध्ये तुमची स्थिती मजबूत राहील. या काळामध्ये तुम्हाला आध्यात्मिक गोष्टीत आवड निर्माण करेल. तसेच मानसिकदृष्ट्या तुम्ही मजबूत राहाल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामात अपेक्षित यश लाभेल. रवि आणि केतुची युती करिअरसाठी खूप चांगली ठरेल. त्याचसोबत नोकरी करणाऱ्या लोकांचा सन्मान आणि आदरही वाढलेला राहील. नातेवाईकांसोबतचे जुने मतभेद दूर होतील.
सूर्य आणि केतूची युती तूळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहणार आहे. आर्थिक आणि व्यावसायिक बाबतीत हा काळ अनुकूल राहील. जे व्यवसाय करत आहेत त्या लोकांना या काळामध्ये असलेल्या समस्या दूर होतील. तुमच्या कामातील अडथळे दूर होतील. तुम्हाला एखाद्या वरिष्ठ किंवा प्रभावशाली व्यक्तीचे सहकार्य मिळू शकते.
रवि आणि केतुची युती वृश्चिक राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये दहाव्या घरात होणार आहे. या लोकांना त्यांच्या कारकीर्दीमध्ये अपेक्षित यश मिळेल. समाजात तुमची प्रतिष्ठाही वाढेल. तुम्हाला अधिक यश, समृद्धी आणि कीर्ती जाणवेल. कुटुंबातील सदस्यही तुमच्यावर खूश होतील.
मकर राशीच्या लोकांसाठी या युतीमुळे करिअर, शिक्षण आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे कौतुक केले जाईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. तसेच तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. तुमच्या जुन्या योजना सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)