फोटो सौजन्य- pinterest
मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पन्न एकादशी म्हणतात. ही एकादशी नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये येते. ज्योतिषशास्त्रानुसार उत्पन्न एकादशीला देवी एकादशी आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. त्यांच्या आशीर्वादामुळे सर्व पाप दूर होतात, असे म्हटले जाते. घरात आणि कुटुंबात सुख, आनंद, शांती, समृद्धी, संपत्ती आणि वैभव इत्यादी गोष्टी वास करतात. नोव्हेंबर महिन्यामधील उत्पन्न एकादशी कधी आहे, मुहूर्त कधी आहे आणि महत्त्व जाणून घ्या
पंचांगानुसार, उत्पन्न एकादशी मार्गशीर्ष कृष्ण एकादशी तिथी शनिवार, 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 12.49 वाजता सुरु होत आहे आणि या तिथीची समाप्ती रविवार, 16 नोव्हेंबर रोजी पहाटे 2.37 वाजता होणार आहे. अशा वेळी शनिवार, 15 नोव्हेंबर रोजी उत्पन्न एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे.
उत्पन्न एकादशीचे व्रत करण्यासाठी सकाळी 8.4 ते 9.25 या शुभ मुहूर्तावर भगवान विष्णू आणि देवी एकादशीची पूजा केली जाते. या दिवशी पूजेसाठी हा चांगला काळ मानला जातो. उत्पन्न एकादशीच्या दिवशी ब्रम्ह मुहूर्त पहाटे 4.58 ते 5.51 पर्यंत असेल. यावेळी अभिजित मुहूर्त सकाळी 11.44 ते दुपारी 12.27 पर्यंत असेल.
यावर्षी उत्पन्न एकादशीला उत्तराफाल्गुनी नक्षत्र पहाटेपासून रात्री 11:34 पर्यंत चालणार आहे त्यानंतर हस्त नक्षत्र असेल. एकादशीचा विष्कंभ योग पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत राहील.
उत्पन्न एकादशीचे व्रत सोडण्यासाठी वेळ रविवार, 16 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.10 ते 3.18 वाजेदरम्यान आहे. त्या दिवशी सकाळी 9.9 वाजता हरि वसरा व्रताची सांगता होईल. एकादशीचे व्रत करणाऱ्यांना हरि वस्रा पूर्ण झाल्यानंतरच उपवास सोडावा लागतो.
देवी एकादशीचा जन्म उत्पन्न एकादशीच्या दिवशी झाला म्हणून तिला उत्पन्न एकादशी असे म्हणतात. उत्पन्न एकादशीला उपवास आणि पूजा केल्याने भगवान विष्णू आणि एकादशी मातेचे आशीर्वाद मिळतात आणि पापांपासून मुक्ती मिळते. एकादशीचे व्रत करणाऱ्यांना मृत्युनंतर मोक्ष आणि भगवान हरीच्या चरणी स्थान मिळते.
ॐ नमो भगवते वासुदेवाय:।।
शान्ताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशम्। विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम्।
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम्। वन्दे विष्णुम् भवभयहरं सर्वलोकैकनाथम्॥
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: उत्पन्न एकादशी मार्गशीर्ष कृष्ण एकादशी तिथी शनिवार, 15 नोव्हेंबर रोजी आहे
Ans: हे व्रत केल्याने समृद्धी, संपत्ती, वैचारिक उत्पन्न आणि आध्यात्मिक वाढ होते
Ans: ज्या व्यक्तींना संपत्ती, आर्थिक स्थिरता आणि उत्पन्न वाढवायचे आहे त्यांनी हे व्रत करावे






