फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रात असे अनेक प्राणी आहेत ज्यांचे घरात असणे शुभ किंवा अशुभ मानले जाते. त्या प्राण्यांपैकी एक मांजर. मांजरींबद्दल लोकांची स्वतःची अशी अनेक मत आहेत आणि अनेक समजुती देखील. बऱ्याचदा आपण वरिष्ठांकडून ऐकतो की, मांजरीमुळे आपल्याला बऱ्याच गोष्टींचे संकेत आधीच मिळतात. मान्यतेनुसार, काही जण मांजर पाळणे शुभ मानतात, तर काही जण अशुभ. जर कोणी मांजर पाळत नसेल आणि मांजर त्याच्या घरी येऊन मांजरीचे पिल्लू जन्म देते, तर त्याचा अर्थ काय? तुमच्या जीवनात घडणाऱ्या विविध गोष्टींचे लक्षण असू शकते का? मांजर घरात पाळणे शुभ की अशुभ जाणून घ्या
जर तुमच्या घरात मांजरीने पिल्लांना जन्म दिला असेल तर ते घरप्रमुखासाठी अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की 90 दिवसांच्या आत कुटुंबातील सदस्य प्रगती करू शकतात आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित यश मिळू शकते. त्यासोबतच घरात मांजरीच्या पिल्लांचा जन्म झाल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही.
ज्योतिषशास्त्रानुसार, घरामध्ये मांजर पाळणे अशुभ आहे कारण मांजर जिथे राहते त्या ठिकाणी नकारात्मक शक्ती आणि ऊर्जा सक्रिय होतात. त्याचप्रमाणे घरात मांजर पाळल्याने राहू तत्व सक्रिय होते. यामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
घरामध्ये सोनेरी रंगाची मांजर पाळणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की अशी मांजर तुमच्यासाठी सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येते. दरम्यान, तपकिरी मांजर घरात आल्यावर संपत्तीचे इतर मार्ग उघडू शकतात. त्याबरोबर तुमची सर्व प्रलंबित कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील आणि तुमचे अडकलेले पैसे देखील परत मिळू शकतात.
मान्यतेनुसार, जर तुमच्या घरी अचानक काळी मांजर आली किंवा रडण्याचा आवाज येऊ लागला असेल तर चांगले लक्षण मानले जात नाही. असे करणारी मांजर एखाद्या अप्रिय घटनेचे किंवा वाईट बातमीचे लक्षण मानले जाते.
मांजर रस्ता ओलांडते ते बऱ्याचदा लोक अशुभ मानतात. पण तुम्हाला माहिती आहे का की मांजरीने डावीकडून उजवीकडे रस्ता ओलांडल्यास तरच ते अशुभ असते. मात्र मांजर रस्ता ओलंडताना दिसल्यास तुम्ही तिच्या मागून गेल्यास ते अशुभ मानले जात नाही.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)