फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये पिवळ्या आणि नारंगी रंगांच्या झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व आहे. धार्मिक कार्यामध्ये या फुलांचा वापर केला जातो. सूर्योदयाच्या रंगासारखी झेंडूची फुले दिसतात. तर केशरी झेंडूच्या फुलांना सूर्यास्ताचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना देखील ही फुले आवडतात. वास्तुशास्त्रानुसार झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. हे रोप घरामध्ये लावल्यास सकारात्मक ऊर्जा घरात येते आणि व्यक्तीच्या संपत्तीत वाढ होते, अशी मान्यता आहे. वास्तूनुसार, झेंडूची फुले कोणत्या दिशेला ठेवावी आणि त्याचे फायदे जाणून घ्या
घरामध्ये योग्य दिशेला झेंडूचे रोप ठेवल्यास घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. घरामध्ये योग्य दिशेने झेंडूची फुले लावल्यास देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे प्रसन्न होतात. त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती मिळते. तसेच या फुलांचा वापर केल्याने आर्थिक संकट दूर होते आणि त्यामुळे धनलाभ होऊ शकतो. तसेच कुटुंबातील वातावरण आल्हाददायक राहते. तसेच जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग येतात.
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या योग्य दिशेने झेंडूची फुले लावणे खूप महत्त्वाचे आहे. जर चुकीच्या ठिकाणी हे रोप लावल्यास व्यक्तीच्या जीवनामध्ये अशुभ परिणाम घडू शकतात. तसेच हे रोप नेहमी घरामध्ये ईशान्य दिशेला लावावे. त्याचप्रमाणे हे रोप नेहमी उत्तर पूर्व दिशेला लावावे. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. हे रोप घरात लावल्याने घरातील वातावरण देखील शुद्ध राहते.
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हे रोप लावणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये दक्षिण किंवा पश्चिम दिशेला कधीही झेंडूचे रोप लावू नये. अन्यथा व्यक्तीला अशुभ परिणामांना सामोरे जावे लागते.
झेंडूचे रोप कधीही घरामध्ये घाणेरड्या जागी, स्वयंपाकघर, बाथरूम आणि शौचालयाजवळ ठेवू नये. अशा ठिकाणी हे रोप ठेवणे अशुभ मानले जाते.
तसेच घरामध्ये कधीही सुकलेले झेंडूचे फूल ठेवू नये किंवा ज्याची पाने सुकलेली असतील असे रोप कधीही घरामध्ये ठेवू नये. हे रोप नेहमी हिरवेगार असतील याची काळजी घ्यावी.
देवी देवतांना झेंडूच्या फुलांची माळ समर्पित केली जाते. यामुळे व्यक्तीवर देवी देवतांचा आशीर्वाद राहतो, अशी मान्यता आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)