सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणपासून 15 किलोमीटरवर असलेलं धामापूर गावातील तळ प्रसिद्ध आहे ते तिथल्या रहस्यांमुळे. असं म्हणतात की, 1530 साली विजयनगर साम्राज्याच्या काळात देसाईंनी धामापूर तलावाचा बंधारा बांधला. मात्र हा बंधारा वारंवार तुटायचा आणि कोणाला याचं कारण कळायचं नाही त्यावेळी बंधाऱ्यावर आई भगवती देवीचं मंदिर उभारण्याचा निर्णय गावाने घेतला. मंदिराच्या गाभाऱ्यात भगवती देवीची चतुर्भुज मूर्ती आहे.मात्र स्थानिक गावकरी असं सांगतात की, आई भगवती देवीचं मूळ मंदिर पाण्याच्या खाली आहे.याबाबची सविस्तर माहिती सोहम रांगणेकर या इन्स्टाग्राम अकाउंटवरु देण्यात आली आहे.
या तळ्याची एक रहस्यमय आख्यायिका आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पुर्वीच्या काळी घरात शुभकार्य असायचं तेव्हा फुलांनी भरलेली परडी पाण्यात सोडी जायची. त्यानंतर ही परडी काही वेळाने दाग दागिन्यांची भरुन यायची. पण ठराविक मुदत संपली की याची परतफेड देखील करावी लागायची. असं म्हटलं जायंचं की हे उसण होतं जे परत करणं गरजेचं असायचं. मात्र एकदा एका लोभी माणसाने दागिने घेतले आणि त्यांची परतफेड केलीच नाही. त्यानंतर ही परंपरा कालांतराने बंद झाली. भगवती देवीचं इथे आजही सत्व आहे. देवीच्या मंदिराच्या बाजूचं असलेलं तळ आणि शांत परिसर पाहण्य़ासारखा आहे. कौलारु मंदिर, जुन्या पद्धतीच्या बांधकामांनी केलेली सजावट मन वेधून घेतात. महाराष्ट्रातील स्वच्छ आणि सुंदर तलाव म्हणून याला गौरविण्यात आलं आहे.
Ans: धामापूर तलाव हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या धामापूर गावात आहे.
Ans: हा तलाव रहस्यमय आख्यायिका, देवी भगवतीचं स्थान आणि सोन्याच्या परडीची कथा यामुळे प्रसिद्ध आहे. आजही या तलावाचं रहस्य पूर्णपणे उलगडलेलं नाही.
Ans: गावकऱ्यांच्या श्रद्धेनुसार, देवी भगवतीची इच्छा नसल्यामुळे बंधारा टिकत नव्हता, त्यामुळे नंतर बंधाऱ्यावर देवीचं मंदिर उभारण्यात आलं.






