शनिदेव आणि भगवान शंकराच्या युद्धाचा परिणाम
शनि हे नाव जरी उच्चारलं तरीही सामान्य माणसाला भिती वाटते. मात्र शनिदेवांनाही 19 वर्ष शिक्षा देण्यात आली होती आणि ही शिक्षा कोणी दिली होती तुम्हाला माहित्ये का? शनिदेव आणि शिव यांच्यात घनघोर युद्ध झाले होते. ही लढाई इतक्या भयंकर पद्धतीने लढली गेली की भगवान शंकरांना आपला तिसरा डोळा उघडावा लागला. तिसरा डोळा उघडल्यानंतर शिव आणि शंभूसमोर शनिदेव वैतागले होते. त्यानंतर भगवान शिवाने शनिदेवांना 19 वर्षांची शिक्षा दिली.
वास्तविक, धार्मिक आणि पौराणिक कथांवर विश्वास ठेवला तर, सूर्यदेवांनी आपल्या सर्व पुत्रांना त्यांच्या क्षमतेनुसार विविध जगाचे स्वामी बनवले, परंतु शनिदेव या विभागणीवर खूश नव्हते. त्यानंतर शनिदेवाने आपली शक्ती वापरून जगावर ताबा मिळवला आणि त्यांना न मिळालेल्या ठिकाणीही त्यांनी आपला ताबा मिळवला. काय आहे ही मजेशीर कथा जाणून घ्या (फोटो सौजन्य – Pinterest)
सूर्यदेवाची नाराजी
शनिने न सांगता आणि न जुमनता काही ठिकाणांवर ताबा मिळावला आहे आणि हे योग्य नाही ही गोष्ट जेव्हा सूर्यदेवाला कळली तेव्हा शनिदेवाच्या या कृतीने त्यांना खूप दुःख झाले. त्यानंतर सूर्यदेव भगवान शिवाकडे मदत मागण्यासाठी पोहोचले. सूर्यदेवाचे शब्द ऐकून भगवान शिवाने आपल्या गणांना शनिदेवाशी युद्ध करण्यासाठी पाठवले. शक्तिशाली शनीने सर्वांचा पराभव केला. त्यामुळे भगवान शिवा अधिक भडकले आणि त्यांनी युद्धात स्वतः उतरायचे ठरवले
पांडव मंदिरात जात नव्हते की पूजा करत नव्हते काय आहे यामागील कारण
शिवशंकर स्वतः युद्धभूमीवर
त्यानंतर भगवान शिवाला स्वतः युद्धभूमीवर जावे लागले. दोघांमध्ये घनघोर आणि जोरदार युद्ध चालू होते. दरम्यान, शनीने भगवान शंकरावर एक घातक दृष्टी टाकली. शनिदेवाने मारक दृष्टीचा वापर केल्याचे शिवाने पाहिल्यावर लगेचच त्यांनी तिसरा डोळा उघडला. तिसरा डोळा उघडताच शनिदेव चकित झाले आणि त्यांचा अहंकार चिरडला गेला. कारण शिवशंकरापेक्षा शक्तिशाली आणि बलवान कोणीच नाही. शिवाचा क्रोध हा सर्व देवांमध्ये अधिक असल्याचे आतापर्यंत सर्वांनीच ऐकले आहे आणि तोच क्रोध शनिदेवांवरही बरसला
भगवान शंकरांनी दिली शिक्षा
शनिदेवाला शिक्षा देण्यासाठी भगवान शिवाने त्यांना 19 वर्षे पिंपळाच्या झाडाला उलटे टांगले. या काळात शनिदेवाने 19 वर्षे भगवान शंकराची पूजा चालू ठेवली आणि त्यानंतरच शनिदेवाची यातून सुटका झाली. हेच कारण आहे की ज्यावेळी कोणत्याही व्यक्तीवर शनीची महादशा येते तेव्हा त्याचे वय 19 वर्षे असते. कुंडलीत सहसा शनिची पहिली महादशा ही 19 व्या वर्षीच आलेली पहायला मिळते. मात्र याचा अर्थ फक्त वाईट होतं अथवा संकटं येतात असा अजिबात नाही
द्रोणागिरी पर्वताजवळ राहणारे लोक हनुमानजीवर का नाराज आहेत? काय आहे त्रेतायुगाशी संबंध
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.