पुरुष म्हणजे पहाडासारखा कणखर आणि भक्कम अशीच त्याची ओळख कायम सांगितली जाते. भारत देशाच्या बाबतीत सांगायचं झालंच तर पुरुषप्रधान देश आशीही ओळख राहिलेली आहे. या पुरुषवर्गाने स्त्रीवर्गाचं शोषण केलं हे जरी खरं असलं तरी याच स्त्रीवर्गासाठी आणि स्त्री संरक्षणासाठी छत्रपती शिवराय, फुले शाहु आंबेडकर हे महापुरुष अनिष्ठ रुढी परंपरांच्य़ा विरोधात भक्कमपणे उभे राहिले. जसं एका स्त्रीमध्ये मातृत्व असतं ती जसं घर सांभाळून नोकरी करते तसाचं पुरुष देखील घराच्या जबादाराऱ्या विनातक्रार पेलत असतो. आजवर अनेक थोर समाजसुधारक स्त्रियांना आईसमान दर्जा दिला गेला आहे. शिक्षणाचा वसा हाती घेतलेली सावित्रीमाई असो की अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सपकाळ. या स्त्रियांनी आईच्या मायेने जसं तर समाजाचं हित पाहिलं अगदी त्याचप्रमाणे या समाजातील अनेक पुरुषांनी देखील देशहीतासाठी आपलं आयुष्य वाहिलं आणि त्यातील एक नाव म्हणजे जमशेटजी टाटा.
भारत देशाचा उद्योग क्षेत्रातील अभिमान म्हणजे टाटा कुटुंब. टाटा ग्रुुपने फक्त आजवर व्यवसाय क्षेत्रात मोठं नाव कमवलं खरं पण त्याचबरोबर देशहिताचा देखील तितकाच विचार केला. याचाच एक किस्सा म्हणजे हाफकिन संशोधन केंद्र. उद्योग जगतात आणि विज्ञान तंत्रनाता देशाला अव्वल स्थान मिळावं यासाठी जमशेटजी टाटा यांनी कायमच मेहनत घेतली. भारताला विकसित करायचं असेल आरोग्य़ यंत्रणा आधी भक्कम पाहिजेत. 1896–97 सुमारास उद्योग जगतात पाऊल ठेवण्यास देश हळूहळू परिपक्व होत होता. त्याचवेळी प्लेगच्या साथीनं माणसं जीवानिशी जाऊ लागली. या महामारीनं मुंबईकरांना जगणं कठीण करुन ठेवलं होतं. त्यावेळी जमशेटची टाटा यांनी या आजारावर लस संधोधन होण्यासाठी पुढाकार घेतला. या काळात रशियन-ज्यू वैज्ञानिक हाफकिन यांना जगातील पहिली प्लेगविरोधी लस विकसित करण्यासाठी भारतात बोलावण्यात आलं. त्यांच्या प्रयोगांसाठी आवश्यक सुविधा, निधी आणि साहित्याची कमतरता होती. त्यावेळी बॉम्बेच्या सामाजिक–औद्योगिक क्षेत्रातील प्रमुख उद्योजक जमशेटजी टाटा यांनी पुढाकार घेतला. हाफकिनच्या संशोधनाला आवश्यक सहाय्य, कामासाठी सुरक्षित जागा आणि आर्थिक पाठबळ देणाऱ्यांमध्ये टाटा समूह अग्रणी होता.
टाटांच्या मदतीमुळे हाफकिनला प्रयोगशाळा विकसित करणे, लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे आणि मुंबईतील लोकांपर्यंत ती पोहोचवणे शक्य झाले. या सहयोगामुळे शहरातील मृत्यूदर कमी झाला व महामारी आटोक्यात येऊ लागली. पुढे 1899 मध्ये “प्लेग रिसर्च लॅबोरेटरी”ची स्थापना झाली. कालांतराने याच प्रयोगशाळेचे नाव बदलून “हाफकिन इन्स्टिट्यूट” असे झाले. आजही भारतातील सर्वात जुनी व प्रतिष्ठित बायोमेडिकल संस्था म्हणून हाफकिन इन्स्टिट्यूटचं महत्व आहे.टाटांचे विज्ञानप्रेम आणि सामाजिक बांधिलकी हाफकिन यांच्या बरोबरच्या या कार्यातून अधिक दृढ झाली. त्यानंतर टाटा समूहाने भारतात वैज्ञानिक संशोधन, सार्वजनिक आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात अनेक मोठे प्रकल्प उभारले, त्यात IISc सारख्या संस्थांचा समावेश आहे.
एवढंच नाही तर, जेव्हा पोलाद कारखान्यासाठीची जागा निश्चित करण्यात आली त्यावेळी देखील जमशेटजींनी परिसरातील आदिवासींचा विचार आधी केला. पोलाद कारखाना ज्या ठिकाणी असतो तिथल्या वातावरणात उष्णता अधिक असते. त्यामुळे त्या परिसारात जास्त झाडं लावण्यात यावी. तसंच तिथल्या आदिवासींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य केंद्र उभारण्यात आलं. टाटा समुहाने आजतागायत फक्त व्यवसाय केला नाही तर देशाचं हित देखील पाहिलं आहे. जमशेटजींना मुंबई शहाराला महामारीच्या काळात पोटच्या मुलाला बापाने सांभाळावं जसं सांभाळलं होतं. त्याकाळी जमशेटजींनी पुढाकार घेतला तेव्हा शहरातील प्लेगची साथ कमी झालाी. उद्योगव्यवसायाबरोबरच देशहित जपाणाऱ्या या पोलादी पुरुषाला जागतिक पुरुष दिनानिमित्ताने नवराष्ट्रचा मानाचा सलाम!
Ans: प्लेगच्या महामारीत (1896–97) लस संशोधनासाठी भारतात आलेल्या वैज्ञानिक वॉल्डेमार हाफकिन यांना प्रयोगशाळा,निधी, साहित्य, सुरक्षित जागा यांचे भक्कम सहकार्य जमशेटजी टाटा यांनी दिले.
Ans: 1899 मध्ये “प्लेग रिसर्च लॅबोरेटरी”च्या नावाने सुरुवात झाली. नंतर त्याचे नाव “हाफकिन इन्स्टिट्यूट” ठेवण्यात आले. आजही ही भारतातील सर्वात जुनी बायोमेडिकल संस्था आहे.
Ans: टाटा समूहाने भारतीय विज्ञान संस्था (IISc) सारख्या संशोधन संस्थांची स्थापना करण्यास मोठे योगदान दिले.






