पुरुषत्वाविषयीच्या सामाजिक संकल्पना बदलण्याची गरज!
सुनयना सोनवणे:नुकताच सोशल मीडियावर स्टेशनवर एकटाच बसून रडणाऱ्या पुरुषाचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा विडिओ पाहिल्यानंतर ‘पुरुष रडत नाहीत’ ही समाजात खोलवर रूजलेली मानसिकता आजही किती टिकून आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पुरुषांनी भावना व्यक्त करू नयेत, वेदना दाखवू नयेत, आणि मानसिक ताण पचवून टाकावा हीच अपेक्षा त्यांच्यासाठी गंभीर मानसिक आरोग्याचा अडथळा ठरत आहे. आज ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिन’ (१९ नोव्हेंबर) असून यावर्षीची थीम ‘सेलिब्रेटींग मेन अँड बॉईज’ अशी आहे. पुरुष आणि मुलांच्या भावनिक, शारीरिक आणि सामाजिक कल्याणाची जाणीव वाढवणे, तसेच त्यांच्या सकारात्मक भूमिकांचा गौरव करणे यावर या दिनानिमित भर देण्यात आला त्याचबरोबर आहे. International Men’s Day पुरुषांसमोरील मानसिक व आरोग्यविषयक आव्हानांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.(फोटो सौजन्य – istock)
पुरुषांना लहानपणापासूनच भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा संस्कार दिला जातो. अगदी छोट्या मुलालाही रडल्यावर ‘मुलीसारखा रडू नकोस’ असे सांगितले जाते. भावना व्यक्त करणे म्हणजे कमजोरी असा गैरसमज मुलांच्या मनावर बिंबवला जातो. यामुळे मोठेपणी रडणे,आमच्याकडे एकूण मिक्षणान्या फोनपैकी जवळपास ७६% फोन पुरुषांचे असतात. अनेक तरुण करिअर, नातेसंबंध, आर्थिक अडचणी अशा कारणांमुळे तीव्र तणावाखाली असतात, व्यक्त होता न आल्याने त्यांच्यात विता, निद्रानाश, निर्णयक्षमता कमी होणे आणि पुढे व्यसनाधीनता किया आत्महत्येचा कल वाढतो.
भीती व्यक्त करणे, किंवा मन मोकळे करणं पुरुषांना कठीण, कधी कधी अपमानास्पदही वाटू लागते. यामुळे त्यांच्यातील मानसिक ताण, एकाकीपणा आणि नैराश्य हळूहळू बाढू लागते, असे मानसोपचारतज्ञ डॉ. रश्मी देशमुख सांगतात.डॉ. नीरज जाधव यांच्या मते, ‘घराची जबाबदारी, आर्थिक स्थैर्य राखणे आणि प्रत्येक परिस्थितीत भावनात्मक स्थिरता दाखवणे या सगळ्या अपेक्षा पुरुषांवर ठेवून समाज त्यांना ‘सर्वकाही सांभाळायलाच हवं’ असा अवास्तव दबाव टाकतो. ही मानसिकता मोडली नाही तर मानसिक आजारांचे प्रमाण वाढत राहील.
८८ मोकलपणाने बोलता न आल्यानु वाढलेल्या तणावाचे व्यसनात रूपांत होते, व्यसन हीदेखील मानसिक आजाराची गंभी पायरी आहे. समाजातील ‘पुरुषत्व’ या चुकीच्य संकल्पना पुरुयांना व्यसनाकडे ढकलतात, सन पुरुषार्थ हा व्यसनाला नकार देण्यात आणि भावन स्वीकारत पुढे जाण्यात आहे.- डॉ. हमीद दाभोळकर सामाजिक कार्यकन दडपणामुळे नैराश्य वाढते. तज्ञांच्या मते भावनिक दडपणामुळे पुरुषांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढते आहे. देतात. राष्ट्रीय गुन्हे नोंद पथकाच्या २०२३ च्या अहवालानुसार देशातील सर्वाधिक अशा एकूण २२,६८७आत्महत्यांचे आकडेही याची प्रचिती आत्महत्या महाराष्ट्रात नोंदल्या गेल्या. भारतातील सर्व आत्महत्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण ७२.८%, तर महिलांचे २७.२५८ आहे. देशातील सर्वाधिक आत्महत्या असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.






