बंगालचा शेवटचा नवाब म्हणून सिराज-उद-दौला याच्याविरोधात ईस्ट इंडिया कंपनी आणि सैन्याचा मोठा डाव रचला (फोटो - सोशल मीडिया)
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक ज्ञात अन् अज्ञात जणांनी प्राणांची आहूती दिली आहे. त्यापैकीच एक म्हणजे बंगालचे शेवटचे राजे सिराजुद्दौला. बंगालचा शेवटचा स्वतंत्र नवाब म्हणून सिराज-उद-दौला यांचा उल्लेख केला जातो. 1756 साली त्यांनी बंगालची राजगादी स्वीकारली आणि केवळ एका वर्षामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सिराज-उद-दौला यांच्या कारकीर्दीमध्ये त्यांनी घरच्या अविश्वास, नातेवाईकांची ईर्षा आणि त्यामधून इंग्रजांनी दिलेली काटा आणणारी शिक्षा भोगली.
राज्यकारभार स्वीकारल्यानंतर अवघ्या एका वर्षामध्ये सिराज-उद-दौला 1457 मध्ये प्लासीच्या लढाईत ब्रिटीशांकडून हारला आणि त्याला भयानक मृत्युदंड मिळाला. ब्रिटीशांनी त्यांच्याच सेनापती मीर जाफरशी संगनमत करून सिराज-उद-दौलाशी विश्वासघात केला, ज्यामुळे त्यांची राजवट संपली आणि बंगालवर ब्रिटिशांना ताबा मिळवता आला. मिर्झा मुहम्मद सिराज-उद-दौला यांचे आजोबा अलीवर्दी खान होते, जे बिहारचे लेफ्टनंट गव्हर्नर आणि नंतर बंगालचे नवाब बनले. अलीवर्दी खान यांना कोणतेही पुत्र नव्हते आणि त्यांनी त्यांचा नातू सिराज याला त्यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. आजोबांच्या मृत्युनंतर सिराज-उद-दौला बंगालचा नवाब झाला.
स्वतःच्या मावशीला ठेवले नजरकैदेत
सिराज-उद-दौलाची बंगालची नवाब म्हणून नियुक्ती झाल्यामुळे त्यांच्या घरामध्ये कारस्थानाला सुरुवात झाली. त्यांची मावशी घासेटी बेगम (मेहर-उन-निसा बेगम), मीर जाफर, जगत सेठ (मेहताब चंद) आणि शौकत जंग (सिराजची चुलत बहीण) यांच्यात मत्सर आणि शत्रुत्व निर्माण झाले. सिराज-उद-दौलाची मावशी घासेटी बेगम यांच्याकडे प्रचंड संपत्ती होती. तिच्याकडून होणाऱ्या तीव्र विरोधाला घाबरून, सिराज-उद-दौलाने मोतीझील पॅलेसमधील तिची सर्व मालमत्ता जप्त केली आणि तिला घरातच नजरकैदेत ठेवले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कट कारस्थानाला मिळाली फोडणी
नवाब झाल्यानंतर, सिराज-उद-दौलाने त्याच्या आवडत्या लोकांना उच्च सरकारी पदे बहाल केली. मीर जाफरच्या जागी मीर मदन बक्षी यांना सैन्याचा वेतनपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आणि मोहनलाल यांना त्यांच्या दिवाणखान्यात दरबारी म्हणून बढती देण्यात आली. यामुळे दरबारींमध्ये फूट पडली आणि सिराज-उद-दौलाच्याच दरबारातील काही सदस्यांनी त्याला पदावरुन पायउतार करण्याचा कट रचला. ईस्ट इंडिया कंपनीच्या आगमनानंतर, ब्रिटीशांनी नवाब सिराज-उद-दौलाविरुद्ध कट रचण्यास सुरुवात केली. दरबारामधील विरोध आणि इंग्रजांचा कट यामुळे सिराज-उद-दौलाची कोंडी झाली आणि त्याच्याविरोधात कटकारस्थान रचण्यात आले.
मीर जाफर, राय दुर्लभ, यार लुतुफ खान, ओमीचंद (अमीर चंद), जगत सेठ, कृष्णचंद्र आणि अनेक सिराज-उद-दौलाच्या स्वतःच्याच सैन्यातील अधिकारी इंग्रजांसोबतच्या कटात सहभागी होते. मीर जाफरने ब्रिटीश अधिकारी क्लाइव्हशी एक करार केला होता ज्यामध्ये राजा सिराजच्या मृत्यूनंतर त्याला बंगालचा नवाब म्हणून नियुक्ती करण्यात येईल, युद्धभूमीवर इंग्रजांना पाठिंबा देण्याच्या आणि कलकत्त्यावर हल्ला करण्याच्या बदल्यात त्यांना मोठी रक्कम देखील दिली जाईल असा करार मीर जाफरने केला होता.
सिराज-उद्दौला प्लासीची लढाई ही फसवणुकीमुळे हारला
मीर जाफर आणि सेठ यांना त्यांच्या आणि इंग्रजांमधील करार ओमीचंदपासून गुप्त ठेवायचा होता. मात्र, जेव्हा त्यांना हे कळले तेव्हा त्यांनी ओमीचंदचा देण्यात येणारे पैसै हे तीस लाख रुपयांपर्यंत वाढवले नाहीत तर कट उघड करण्याची धमकी त्याने दिले. हे ऐकून हुशार क्लाइव्हने दोन करार तयार केले: मूळ करार पांढऱ्या कागदावर, ज्याचा ओमीचंदशी काहीही संबंध नव्हता आणि दुसरा लाल कागदावर, ज्यामध्ये ओमीचंदच्या अटी होत्या, त्याला फसवण्यासाठी. या फसवणुकीमुळे सिराज-उद्दौला २३ जून १७५७ रोजी प्लासीची लढाई हरला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्लासीची लढाई हरल्यानंतर, असे म्हटले जाते की सिराज-उद्दौला उंटावर बसून मुर्शिदाबादला पळून गेले. सिराज-उद्दौला नागरी साधे कपडे घालून पळून गेले. त्याने त्याची पत्नी लुत्फ-उन-निसा आणि काही जवळच्या सहकाऱ्यांना झाकलेल्या गाड्यांमध्ये बसवले, तो घेऊन जाऊ शकेल तितके सोने आणि दागिने घेतले आणि राजवाड्यातून पळून गेला. दुसऱ्याच दिवशी, हुशार रॉबर्ट क्लाइव्हने मीर जाफरला एक चिठ्ठी पाठवली ज्यामध्ये लिहिले होते, “या विजयाबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. हा विजय माझा नाही तर तुमचा आहे. मला आशा आहे की तुम्हाला नवाब घोषित करण्याचा मान मला मिळेल.”
मृतदेह हत्तीवर बसवून फेरफटका
मीर जाफर आणि त्याचा मुलगा मीरान यांच्या आदेशानुसार, मोहम्मदी बेग आणि त्याच्या साथीदारांनी सिराज-उद-दौलाचा खंजीर आणि तलवारींनी शिरच्छेद केला. दुसऱ्या दिवशी, सिराज-उद-दौलाचा विकृत मृतदेह हत्तीच्या पाठीवर बसवून मुर्शिदाबादच्या रस्त्यांवर आणि बाजारपेठेत नेण्यात आला. या क्रूरतेचे वर्णन करताना, सय्यद गुलाम हुसेन खान लिहितात, “या भयानक प्रवासादरम्यान, हत्तीच्या माहूतने हुसेन कुली खानच्या घरासमोर जाणूनबुजून हत्तीला थांबवले, कारण सिराज-उद-दौलाने दोन वर्षांपूर्वी हुसेन कुली खानची हत्या केली होती.”
मीर जाफर आणि मीरानची क्रूरता
मीर जाफर आणि त्याचा मुलगा मीरानची क्रूरता तिथेच थांबली नाही. काही दिवसांनी, त्यांनी अलिवर्दी खानच्या कुटुंबातील सर्व महिलांनाही मारले. सत्तर निष्पाप महिलांना एका बोटीवर बसवून हुगळी नदीच्या मध्यभागी नेण्यात आले आणि बोट बुडवण्यात आली. वाचलेल्या महिलांना विष देऊन मारण्यात आले. फक्त एकच महिला वाचली. ती सिराज-उद-दौलाची पत्नी लुत्फ-उन-निसा होती. मीरान आणि त्याचे वडील मीर जाफर दोघांनीही तिला लग्नाचे प्रस्ताव पाठवले. पण लुत्फ-उन-निसाने हा प्रस्ताव नाकारला आणि म्हटले, “मी यापूर्वी हत्तीवर स्वार झाले आता मी पुन्हा गाढवावर स्वार होणार नाही.”