World Television Day 2025: दूरदर्शन दिन का साजरा करतात? जाणून घ्या त्याचा इतिहास आणि भारतातील टीव्हीचा प्रवास ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
World Television Day 2025 : आज जगभरात जागतिक दूरदर्शन दिन (World Television Day) साजरा केला जात आहे. संयुक्त राष्ट्रांनी १९९६ मध्ये हा दिवस अधिकृतपणे घोषित केला असून, दूरदर्शनचे जागतिक पातळीवरील वाढते महत्त्व ओळखून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. माहिती, शिक्षण आणि मनोरंजन या तिन्ही क्षेत्रांमध्ये क्रांती घडवणाऱ्या दूरदर्शनचे योगदान आजही कायम प्रभावी आहे.
दूरदर्शनचा इतिहास १९२० च्या दशकात सुरू झाला. इंग्लिश अभियंता जॉन लोगी बेयर्ड यांनी १९२७ मध्ये पहिले कार्यरत काळा–पांढरे दूरदर्शन सादर केले, ज्यामुळे जागतिक संप्रेषण क्षेत्रात मोठा बदल घडून आला. नंतर टेक्नॉलॉजी विकसित होत गेली आणि दूरदर्शन जगभरात लोकप्रिय झाले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पृथ्वीचा सर्वात खालचा बिंदू आणि त्यातील जीवंत चमत्कार; वाचा का आहे जगाला ‘या’ महासागराचे इतके आकर्षण?
जगात दूरदर्शन उपलब्ध झाल्यानंतर भारतात त्याला पोहोचण्यासाठी जवळपास तीन दशके लागली. १५ डिसेंबर १९५९ रोजी युनेस्कोच्या सहाय्याने भारतात पहिले टीव्ही प्रसारण सुरू झाले. आकाशवाणी भवनात भारताचे पहिले दूरदर्शन सभागृह उभारण्यात आले आणि राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. भारतासाठी आणखी एक मोठी ऐतिहासिक घटना १५ ऑगस्ट १९८२ रोजी घडली, जेव्हा देशाने पहिले रंगीत दूरदर्शन प्रसारण पाहिले. या दिवशी पंतप्रधान इंदिरा गांधींचे स्वातंत्र्यदिनाचे भाषण रंगीत स्वरूपात प्रसारित झाले आणि देशातील प्रसारण क्षेत्राचा नवा अध्याय सुरू झाला.
प्रारंभीच्या काळात टीव्ही मोठ्या बॉक्सच्या स्वरूपात उपलब्ध होता आणि अनेक ठिकाणी गावातील एकाच टीव्हीसमोर लोकांची गर्दी जमायची. मात्र तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हा बॉक्स हळूहळू स्लिम एलईडी, एचडी, 4K, ओएलईडी आणि अखेरीस AI सक्षम स्मार्ट टीव्हीच्या रूपात विकसित झाला. मनोरंजन, बातम्या आणि शिक्षण सर्व काही एका क्लिकवर उपलब्ध झाले.
हे देखील वाचा : वर्षअखेरची Best Trip! ‘पोर्ट ब्लेअर, हॅवलॉक, नील आयलंड…’; IRCTC ने पर्यटकांसाठी जाहीर केले ‘हे’ खास पॅकेज
या दिवसाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे दूरदर्शनचे समाजातील बदल घडविणारे योगदान अधोरेखित करणे. टीव्ही हे फक्त मनोरंजनाचे साधन नसून—
दूरदर्शनने घराघरात ज्ञान पोहोचवले आणि लोकांना जगाशी जोडले. म्हणूनच २१ नोव्हेंबर हा दिवस टीव्हीच्या जागतिक महत्त्वाचा सन्मान म्हणून साजरा केला जातो.
जागतिक दूरदर्शन दिनानिमित्त देशभरातील अनेक शाळा, महाविद्यालये आणि मीडिया संस्था विशेष कार्यक्रम, व्याख्याने आणि भाषणे आयोजित करतात. विद्यार्थी दूरदर्शनचा इतिहास, प्रसारणातील बदल आणि आधुनिक माध्यमांची भूमिका याबद्दल चर्चा करतात.
Ans: २१ नोव्हेंबर रोजी.
Ans: जॉन लोगी बेयर्ड, १९२७ मध्ये.
Ans: १५ डिसेंबर १९५९ रोजी.






