वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी जागतिक पुस्तक दिन साजरा केला जात आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
एका व्यक्तीला एका वेळी एकच आयुष्य अनुभवता येते. मात्र एका वाचकाला एकावेळी अनेक अनुभव, घटना आणि गोष्टीचा पुस्तकांच्या माध्यमातून अनुभवता येतो. पुस्तक वाचन हे व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक खुलवते. रहस्यमयी पुस्तकांमधून आणि कादंबरीमधून काल्पनिक जगामध्ये वावरता येते. वाचनाने माणूस समृद्ध, सुशील आणि बहुआयामी होतो. हीच वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी आणि नवीन पिढीमध्ये रुजवण्यासाठी आजच्या दिवशी जागतिक पुस्तक दिन आणि कॉपीराइट दिन साजरा केला जातो. 1995 या वर्षी पहिल्यांदाच हा दिवस साजरा करण्यात आला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
23 एप्रिल असलेले मृत्यू दिनविशेष






