Samsung चा मास्टरस्ट्रोक! Galaxy Unpacked 2026 पूर्वीच भारतात एंट्री करणार 'हे' ढासू 5G स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
Airtel Recharge Plan: कंपनीने कमी केले ‘या’ प्लॅन्सचे डेटा बेनिफिट्स, यूजर्स झाले नाराज! जाणून घ्या
हा एक स्वस्त 5G स्मार्टफोन असणार आहे. टिपस्टर अभिषेक यादवने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, हा स्मार्टफोन डिसेंबर 2025 च्या शेवटी किंवा जानेवारी 2026 च्या सुरुवातीला लाँच केला जाऊ शकतो. हा आगामी स्मार्टफोन Galaxy A07 4G (जो ऑक्टोबर 2025 मध्ये 8,999 रुपयांत लाँच करण्यात आला होता) चा अपग्रेडेड 5G वर्जन असणार आहे. या स्मार्टफोनच्या लाँचिंगमागील कंपनीचा उद्देश आहे की, पहिल्यांदा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या यूजर्सना 5G कनेक्टिविटी ऑफर करणं. (फोटो सौजन्य – Pinterest)
ज्यांना मिड रेंज किंमतीत नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा आहे, अशा लोकांसाठी Samsung Galaxy A37 5G फेब्रुवारी 2026 पर्यंत बाजारात लाँच केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये Exynos 1480 चिपसेट आणि Samsung Xclipse 530 GPU दिला जाण्याची शक्यता आहे. हा तोच प्रोसेसर आहे, जो Galaxy A55 आणि Galaxy F56 सारख्या मॉडेल्समध्ये आहे.
या लाईनअपमधील सर्वात पावरफुल स्मार्टफोन Galaxy A57 5G असणार आहे. हा स्मार्टफोन सर्टिफिकेशन वेबसाइट्सवर दिसला आहे. यामध्ये नवीन Exynos 1680 प्रोसेसर दिला जाण्याची शक्यता आहे. गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी या स्मार्टफोनला Samsung Xclipse 550 GPU सह जोडण्यात आलं आहे. IMEI डेटाबेस लिस्टिंगने पुष्टी केली आहे की, हा फोन ग्लोबल मार्केटसह भारतात देखील लाँच केला जात आहे. कंपनीने अद्याप या तिन्ही स्मार्टफोन्सबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. मात्र यूजर्सना या तिन्ही स्मार्टफोन्सची प्रतिक्षा आहे. याशिवाय यूजर्स आगामी ईव्हेंटची देखील आतुरतेने वाट बघत आहेत. कंपनी यावेळी ईव्हेंटमध्ये कोणते स्पेशल गॅझेट्स लाँच करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






