फोटो सौजन्य - सोशल मिडिया
मागिल काही महिन्यामध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी क्रिकेटच्या अनेक फाॅरमॅटमधून सोशल मिडियावरच निवृतीची घोषणा केली होती. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली त्याचबरोबर चेतेश्वर पुजारा, आर अश्विन यासांरख्या दिग्गज खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. भारताचा दिग्गज खेळाडू आर अश्विनने आयपीएलमधून देखील निवृती घेतली आहे. आर अश्विननंतर, आणखी एका भारतीय फिरकी गोलंदाजाने निवृत्तीची घोषणा केली आहे.
२५ वर्षे व्यावसायिक क्रिकेटमध्ये सक्रिय असलेल्या अमित मिश्राने गुरुवार, ४ सप्टेंबर रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल तसेच भारताच्या स्थानिक क्रिकेटमध्ये दिसणार नाही. तथापि, आता तो जगातील इतर टी-२० लीगमध्ये खेळू शकतो. भारताच्या सर्वात सातत्यपूर्ण गोलंदाजांपैकी एक असलेल्या अमित मिश्राने निवृत्तीचे कारण कळल्यानंतर तुम्हाला त्याचे कौतुक वाटेल.
अमित मिश्रा म्हणाले की, हा निर्णय प्रामुख्याने वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे आणि तरुण पिढीला मोठ्या मंचावर चमकण्याची संधी दिली पाहिजे या विश्वासावर आधारित आहे. एक प्रेस रिलीज जारी करताना अमित मिश्राने त्याच्या निवृत्तीबद्दल माहिती दिली. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत, अमित मिश्राने त्याच्या फिरकी गोलंदाजीच्या कौशल्याने भारतासाठी अनेक सामने जिंकले आणि आयपीएलमध्येही तो एक मोठा नाव होता. इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वोत्तम टी-२० लीग आहे आणि या लीगमधील त्याची कामगिरी अद्भुत राहिली आहे.
निवृत्तीबद्दल अमित मिश्रा म्हणाला, “क्रिकेटमधील माझ्या आयुष्यातील ही २५ वर्षे संस्मरणीय राहिली आहेत. या काळात माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या बीसीसीआय, प्रशासन, हरियाणा क्रिकेट असोसिएशन, सपोर्ट स्टाफ, माझे सहकारी आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांचा मी मनापासून आभारी आहे.”
Amit Mishra has announced his retirement from professional cricket.
He represented India in 22 Tests, 36 ODIs, and 10 T20Is, picking up 156 wickets at the highest level.
Mishra is also the only bowler to take three hat-tricks in the IPL, with 174 wickets from 162 matches. pic.twitter.com/XUpGJiOzez
— Circle of Cricket (@circleofcricket) September 4, 2025
त्यांनी पुढे लिहिले, “मी ज्या चाहत्यांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे हा प्रवास संस्मरणीय बनवला, जेव्हा जेव्हा आणि कुठेही मी खेळलो, त्यांचे मी आभार मानू इच्छितो. क्रिकेटने मला असंख्य आठवणी आणि अमूल्य धडे दिले आहेत आणि मैदानावर घालवलेला प्रत्येक क्षण एक अशी आठवण बनली आहे जी मी आयुष्यभर जपून ठेवेन.” भविष्यात, अमित मिश्रा शक्य तितके खेळात सहभागी राहण्याचा मानस बाळगतात, मग ते कोचिंग, कॉमेंट्री किंवा तरुण क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करून असो.