वैभव सूर्यवंशीचे इंटरनॅशनल डेब्यू (फोटो- ट्विटर)
वैभव सूर्यवंशीने 15 वर्ष 99 व्या दिवशी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण केले आहे. तिलक वर्माने त्याला कॅप परिधान केली. भारतासाठी सर्वात कमी वयात डेब्यू करण्याचा मान वैभव सूर्यवंशीने प्राप्त केला आहे. या आधी हा रेकॉर्ड मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावार होता. सचिन तेंडुलकरने 16 व्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले होते.
The start of a special chapter ✨ A proud moment as Vaibhav Sooryavanshi receives his #TeamIndia cap from Vice-Captain Tilak Varma 🧢 Updates ▶️ https://t.co/WYfL8tAm58 #ENGvIND pic.twitter.com/zpLtixYDgM — BCCI (@BCCI) July 4, 2026
आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी
आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीने शानदार कामगिरी केली आहे. त्याने 700 पेक्षा जास्त रन्स आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून केल्या होत्या. सर्वाधिक सिक्स देखील त्याने मारले आहेत. त्यानंतर त्याने ट्राय सिरिजमध्ये देखील शानदार खेळी केली होती. भारत अ संघाकडून त्याने चांगली कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीने ऑरेंज कॅप प्राप्त केली होती.
वादळाला किती वेळ रोखणार? इंग्लंडविरुद्ध कसा आहे Vaibhav Suryvanshi चा रेकॉर्ड? वनडे सिरिजमध्ये…
इंग्लंडविरुद्ध कसा आहे Vaibhav Suryvanshi चा रेकॉर्ड?
इंग्लंडविरुद्ध यूथ टेस्ट सिरिज खेळताना वैभव सूर्यवंशीने 4 सामन्यांमध्ये केवळ 90 रन्स केल्या होत्या. यामध्ये त्याने एक अर्धशतक लगावले होते. त्याचा 56 रन्सची खेळी ही हाय स्कोअरिंग खेळी होती. मात्र यूथ वनडे सिरिजमध्ये वैभव सूर्यवंशीने शानदार फलंदाजी केली होती. त्याने या सिरिजमध्ये 5 वनडे सामन्यांमध्ये 355 रन्स केल्या आहेत. यामध्ये त्याने एक शतक आणि एक अर्धशतक लगावले आहे. त्याचा हाय स्कोअर हा 143 रन्स इतका आहे.






