बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 (Chess Olympiad 2022) स्पर्धेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज करण्यात आलं. पाच वेळच्या विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने या सोहळ्यातँ मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडे स्पर्धेची क्रीडा ज्योत साोपवली. चेन्नई येथील ईस्ट कोस्ट रोडवर असलेल्या शेरेटन महाबलीपुरम रिसॉर्ट आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
[read_also content=”बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल स्पर्धेचं थाटात उद्घाटन, मलालाकडून खेळाडूंचं स्वागत https://www.navarashtra.com/sports/birmingham-commonwealth-games-started-with-grand-opening-ceremony-nrps-309310.html”]
पंतप्रधानांनी या स्पर्धेच्या आयोजनाबाबत आनंद व्यक्त करत, ‘ही स्पर्धा ‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा’दरम्यान होत असून बुद्धिबळाची सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा भारतात, बुद्धिबळाच्या मायदेशात होत आहे.’ असंही ते म्हणाले. या यावेळी तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन, केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि एल. मुरुगन यांच्यासह एफआयडीई अर्थात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष अर्केडी वोर्कोव्हीच हे देखील उपस्थित होते.यावेळी
44वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड ही स्पर्धा प्रथमच भारतात होत असून ही स्पर्धा अनेक गोष्टींची आणि अनेक विक्रमांची साक्षीदार असेल असा विश्वास देखील मोदी यांनी व्यक्त केला. तसंच भारतात क्रीडा क्षेत्रासाठी सध्या उत्तम काळ आहे. युवावर्गाची उर्जा आणि त्यांना सक्षम करणारे वातावरण यांचा योग्य मिलाफ साधल्याने भारतातील क्रीडा संस्कृती अधिकाधिक सशक्त होत आहे. असंही पंतप्रधान म्हणाले.
[read_also content=”राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात, पहिल्यात दिवशी आज भारताचे 9 सामने! https://www.navarashtra.com/sports/birmingham-commonwealth-games-started-first-start-with-9-match-for-india-nrps-309322.html”]