फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
Adam Zampa out of IPL 2025 : एसआरएचचा आयपीएलमधील आतापर्यंतचा प्रवास काही खास राहिलेला नाही. संघाला फक्त दोन सामने जिंकता आले आहेत. याशिवाय संघाचा स्टार लेग स्पिनर अॅडम झांपा दुखापतीमुळे बाहेर आहे. या क्रमाने, एसआरएचने आता त्याच्या जागी खेळाडूची घोषणा केली आहे.
सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने टाटा आयपीएल २०२५ च्या उर्वरित सामन्यांसाठी दुखापतग्रस्त अॅडम झंपाच्या जागी स्मरन रविचंद्रनला करारबद्ध केले आहे. स्मरन रविचंद्रन हा डावखुरा फलंदाज आहे जो स्थानिक क्रिकेटमध्ये कर्नाटककडून खेळतो. आतापर्यंत त्याने ७ प्रथम श्रेणी, १० लिस्ट ए आणि ६ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ११०० हून अधिक धावा केल्या आहेत. एसआरएचने त्याला ३० लाख रुपयांना खरेदी केले आहे.
🚨 News 🚨
CSK pick Ayush Mhatre as injury replacement for Ruturaj Gaikwad, SRH sign Smaran Ravichandran for the injured Adam Zampa
Details 🔽 | #TATAIPL | @ChennaiIPL | @SunRisers
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2025
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात रविचंद्रन विकला गेला नाही परंतु त्यानंतर त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे अनेक संघांना त्यांच्या निर्णयाबद्दल पश्चात्ताप करावा लागला. त्याने विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात कर्नाटकसाठी विजयी शतक झळकावले आणि रणजी ट्रॉफीमध्ये अनेक शानदार शतकेही झळकावली. याशिवाय, त्याने गुलबर्गा मिस्टिक्सकडून खेळताना महाराजा ट्रॉफीमध्ये शानदार फलंदाजी केली. या स्पर्धेत त्याने ४३.१४ च्या सरासरीने आणि १४५.१९ च्या स्ट्राईक रेटने एकूण ३०२ धावा केल्या. या कामगिरीच्या जोरावर त्याला पुन्हा संधी मिळाली.
तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या प्री-सीझन नेटमध्ये होता आणि त्याने प्रशिक्षकांनाही प्रभावित केले होते असे वृत्त आहे. तथापि, एसआरएचची फलंदाजी फळी खूपच मजबूत आहे, त्यामुळे त्याला लगेच संघात स्थान मिळणे कठीण होईल. पण जर रविचंद्रन संधी मिळाली तर तो नक्कीच स्टार खेळाडू ठरू शकतो.
सनरायझर्स हैदराबादच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर संघाने पहिला सामना जिंकला होता त्यानंतर संघाला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला आहे. मागील सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादचा सामना पंजाब किंग्सविरुद्ध झाला यामध्ये संघाने एकतर्फी विजय मिळवला होता. यामध्ये अभिषेक शर्माने आयपीएलचे पहिले शतक झळकावले होते. गुणतालिकेमध्ये हैदराबादचा संघ ४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. हैदराबादचे आतापर्यत ६ सामने झाले आहेत यामध्ये त्यांनी पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध जिंकला होता, त्यानंतर सलग चार सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.