फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Lockie Ferguson out of IPL 2024 : १२ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्सच्या संघाने पहिले फलंदाजी करत ६ विकेट्स गमावून २४५ धावा केल्या होत्या. पण सनरायझर्स हैदराबादच्या संघाने हे लक्ष्य २ विकेट गमावून पूर्ण केले होते आणि या स्पर्धेमध्ये पंजाब किंग्सच्या संघाचा दुसरा पराभव होता. आता पंजाब किंग्सच्या महत्वाच्या गोलंदाजांच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या पंजाब किंग्जला हंगामाच्या मध्यातच मोठा धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाबाहेर आहे. पंजाबचे प्रशिक्षक जेम्स होप्स यांनी सोमवारी याची पुष्टी केली. मंगळवारी पंजाबचा सामना घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सशी होईल. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात फर्ग्युसनला दुखापत झाली होती. तो संपूर्ण सामना खेळू शकला नाही आणि मध्येच बाद झाला. या सामन्यात त्याने फक्त दोन चेंडू टाकले.
“लॉकी फर्ग्युसन अनिश्चित काळासाठी बाहेर आहे. हंगामाच्या शेवटी तो आमच्या संघात परतण्याची शक्यता खूपच कमी आहे. मला वाटते की त्याला खूप गंभीर दुखापत झाली आहे,” होप्सने सोमवारी कोलकाताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले. जर आपण तपासून पाहिले तर, संघाकडे सध्या फर्ग्युसनसारख्या खेळाडूचा पर्याय नाही. संघ त्याची जागा अफगाणिस्तानच्या अझमतुल्लाह उमरझाईच्या रूपात घेऊ शकतो. संघाकडे विजयकुमार विशाखचा पर्याय देखील आहे. कोलकाताविरुद्ध त्याला या दोघांपैकी एकाची निवड करावी लागेल. फर्ग्युसनने चार सामन्यात पाच विकेट्स घेतल्या.
🚨 𝑩𝑹𝑬𝑨𝑲𝑰𝑵𝑮 🚨
Big blow for PBKS! 😕
PBKS fast bowling coach James Hopes confirms that Lockie Ferguson’s injury is big, and there’s very little chance he’ll be fit for the remainder of IPL 2025 ❌👀#LockieFerguson #IPL2025 #PBKS #Sportskeeda pic.twitter.com/2cJuUygoEz
— Sportskeeda (@Sportskeeda) April 14, 2025
पंजाब हा असा संघ आहे ज्याने आतापर्यंत एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही. या संघाने फक्त एकदाच अंतिम सामना खेळला आहे आणि त्यातही त्यांना कोलकाताकडून पराभव पत्करावा लागला. या संघाने २०१४ मध्ये ही अंतिम फेरी खेळली होती. या हंगामात, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली, संघ उत्तम फॉर्ममध्ये दिसत आहे आणि विजेतेपदाचा दावेदार देखील मानला जात आहे.
गुणतालिकेबद्दल सांगायचे झाले तर पंजाब किंग्सच्या संघाने आतापर्यत ५ सामने खेळले आहेत यामध्ये त्यांनी ३ सामान्यांमध्ये विजय मिळवला आहे तर २ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या पंजाब किंग्सच्या संघाला मागील दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या ६ गुणांसह पंजाब किंग्सचा संघ सहाव्या स्थानावर आहे.