मेलबर्न: रविवारी टी २० विश्वचषकातील पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करू विश्वचषकात दमदार सुरुवात केली आहे. भारताने 4 विकेटने पाकिस्तानवर मात केली. दीवाळीच्या एक दिवस आधी भारतीय संघाने देशवासियांना जल्लोषाचं निमित्त दिल. अशातच पाकिस्तानी क्रिकेटर भारतातील राममंदिर पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Jai Shree Ram happy Diwali to all around the Globe .My aim is to visit RAM Mandir Ram Bhagwan I will come — Danish Kaneria (@DanishKaneria61) October 24, 2022
पाकिस्तानी क्रिकेटर दानिश कनेरियाने (Danish Canary) सोमावारी टि्वट करुन त्यात जय श्री राम म्हटलं आहे. संपूर्ण विश्वाला त्याने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच माझं पुढचं लक्ष्य राम मंदिर पाहण आहे. त्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाला येणार असं त्याने म्हटलं आहे. पाकिस्तानी क्रिकेटर दानिश कनेरियाने पाकिस्तानसाठी ६१ कसोटी आणि १८ वनडे सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दानिश कनेरियाच्या नावावर २६१ टेस्ट आणि वनडेमध्ये १५ विकेट आहेत.






